Download App

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताचा मोठा निर्णय, धर्मशाळा विमानतळ बंद, आयपीएल सामने रद्द होणार?

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मोठी कारवाई करत हवाई हल्ला करत बदला घेतला आहे.

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मोठी कारवाई करत हवाई हल्ला करत बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असं या ऑपरेशनला नाव देण्यात आले आहे. या ऑपरेशननंतर भारताने मोठा निर्णय घेत देशातील काही विमानतळे पुढील काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानतळांमध्ये धर्मशाळा विमानतळाचा (Dharamsala Airport) देखील समावेश आहे.

धर्मशाळा विमानतळ बंद केल्याने याचा परिणाम आयपीएल संघांच्या प्रवास वेळापत्रकावर झाला आहे. गुरुवार 8 मे रोजी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. तर 11 मे रोजी पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात धर्मशाळा येते सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे धर्मशाळा विमानतळ बंद केल्याने धर्मशाळा येथे होणारे आयपीएल सामने रद्द होणार का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे धर्मशाळा हे पंजाब किंग्ज संघाचे दुसरे होम ग्राउंड असल्याने पंजाब संघाला सध्या प्रवासाशी कोणतीही समस्या येणार नाही कारण पंजाबचा संघ या आठवड्याच्या अखेरपर्यंत धर्मशाळा येतेच राहणार आहे. तर मुंबई संघाचे प्रवास वेळापत्रक अजूनही ठरलेला नाही. तर “सध्या सर्व काही अनिश्चित आहे. संघांशी चर्चा सुरू आहे आणि जर विमानतळ बंद असेल तर धर्मशाळाहून दिल्लीला परत कसे जायचे याचाही ते विचार करत आहेत,” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले. विमानतळे बंद झाल्याने आयपीएल सामने रद्द होणार का? याबाबत सध्यातरी बीसीसीआयकडून (BCCI)  कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईनंतर देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान 18 विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यात श्रीनगर, जेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगर यांचा समावेश आहे.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तान असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली होती. यानंतर भारताकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

स्व.अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025 ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर!

सर्वातआधी भारताने पाकिस्तानसबोत असणारा सिंधू जल करार रद्द केला आणि देशात असणाऱ्यासर्व पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. तर आता भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत बदला घेतला आहे.

follow us