स्व.अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025 ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर!

स्व.अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025 ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर!

Arun Paudwal Gratitude Award 2025 : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार  स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ  देण्यात येणारा  ” कृतज्ञता गौरव पुरस्कार ”  यंदा  सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. शनिवार 10 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता  सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये अनुराधाजींच्या शुभहस्ते  पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होईल. हा समारंभ अनुराधाजींच्या खार (पश्चिम) येथील राहत्या घरी संपन्न होणार आहे. शाल , श्रीफळ , स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये – 51,000 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  या पुरस्कार सोहळ्याचे हे यंदाचे 28 वे वर्ष आहे.

आजवर या पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर

पार्श्वगायक-  जी. मल्लेश ,  संगीतकार – राम कदम,  यशवंत देव , प्रभाकर जोग,  दत्ता डावजेकर, अशोक पत्की,  संगीत संयोजक – श्यामराव कांबळे,  तालवादक – जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक – उल्हास बापट, गीतकार –  जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर,  भावगीत गायक – अरुण दाते,  गिटार वादक-  रमेश अय्यर, सुनील कौशिक, ध्वनिमुद्रक – डी. ओ. भन्साळी, अविनंदन टागोर,  हेमंत पारकर, सत्येन पौडवाल, युवा गायक – गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी,  मदन काजळे, त्यागराज खाडिलकर.

ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचा परिचय

उत्तरा केळकर यांनी अर्थशास्त्र या विषयात B. A. ची पदवी घेतली असून मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. किराणा घराण्याचे प्रसिद्ध  गायक पंडित फिरोज दस्तूर यांच्या कडे त्यांनी शास्त्रीय रागदारी संगीत शिक्षण घेतले तर सुगम संगीताचे शिक्षण मराठीमधील ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव व श्रीकांत ठाकरे यांच्याकडे घेतले. त्यांच्या गायन कारकिर्दीला 53 वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीमध्ये आजवर त्यांनी 12 विविध भाषांमध्ये 425 हुन अधिक चित्रपटांसाठी, 650 हुन अधिक कैसेट्स व सीडीज साठी तसेच अनेक शॉर्ट फिल्म्स, जाहिराती व जिंगल्स साठी पार्श्वगायन केले आहे. त्यांच्या गायन कारकिर्दीवर आधारित “उत्तर रंग” हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले असून त्यांनी त्यांच्या गायनाचे देशात व परदेशात अनेक जाहीर कार्यक्रम सादर केलेले आहेत.

उत्तरा केळकर यांची गाजलेली काही गीते

01 सत्यम शिवम सुंदरा – सुशीला – राम कदम

02 अग नाच नाच राधे – गोंधळात गोंधळ – विश्वनाथ मोरे

03 झन झन नन छेडील्या तारा – हळदी कुंकू – विश्वनाथ मोरे

04 भन्नाट रानवारा – कशासाठी प्रेमासाठी – सुधीर मोघे

05 मंदिरात अंतरात तोच – धाकटी सून – सुधीर फडके

06 गडद जांभळ भरलं आभाळ – एक होता विदुषक – आनंद मोडक

07 येशील येशील राणी – पोरींची कमाल बापाची धमाल – यशवंत देव

08 कुणीतरी येणार येणार ग – अशी ही बनवा बनवी – अरुण पौडवाल

09 बहिणाबाई ची गाणी – यशवंत देव

10 देवांचाही देव करितो – आई – विश्वनाथ मोरे

11 बिलन शी नागीन निघाली – परिश ठाकूर

12 अशी चिक मोत्याची माळ – परेश शाह

13 चला जेजुरी ला जाऊ – नवरा माझा नवसाचा – जितेंद्र कुलकर्णी

‘अष्टपदी’चे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मिळालेले सन्मान व पुरस्कार

महाराष्ट्र राज्य शासनाचा “सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार”  – 2 वेळा

सूर सिंगार संसद चा प्रतिष्ठित “मिया तानसेन पुरस्कार”

उमेद पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, राम कदम पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार इ.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या