Commonwealth Games 2030 : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games 2030) आयोजनासाठी बोली लावण्याच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मान्यतानंतर आता भारत 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी लिलावात बोली लावणार आहे.
यजमान सहयोग करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी, या बैठकीत गुजरात सरकारला अनुदान सहाय्य देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. जर भारताने कॉमनवेल्थचे आयोजन करण्याची बोली जिंकली तर त्यासाठी ठोस तयारी करता येईल. 2023 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 72 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहे. यामध्ये, जर खेळाडूंसोबतच प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी, चाहते, मीडियाचे लोकही भारतात आले तर स्थानिक व्यवसायांना मोठा फायदा होईल आणि लोकांचे उत्पन्नही वाढेल.
🚨 Cabinet approves India’s bid for 2030 Commonwealth Games. pic.twitter.com/xCPlZR3aZc
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) August 27, 2025
अहमदाबाद होस्ट करणार?
कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी अहमदाबाद ही पहिली पसंती आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमने 2023 च्या आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. जर भारतात कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन झाले तर भारतातील पर्यटन वाढेल. याशिवाय भारतातील तरुण खेळाडूंना खेळात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
HDFC Bank चे नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार; जाणून घ्या सर्वकाही नाहीतर…