Download App

हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी अन् भारताचा शानदार विजय, बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा

IND vs BAN : भारत आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या तीन T20 सामन्यांची मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत

  • Written By: Last Updated:

IND vs BAN : भारत आणि बांगलादेशमध्ये (IND vs BAN) सुरु असलेल्या तीन T20 सामन्यांची मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा उडावला आहे. ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 127 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य सहज गाठले. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने लिटन दासची विकेट घेतली यानंतर परवेझ हुसैन इमॉनने 8 धावा, तौहीद हृदयॉयने 12 धावा आणि महमुदुल्लाहने 1 धावा केल्या तर झाकीर अलीने 8, कर्णधार शांतोने 27, रिशाद हुसेनने 11, तस्किन अहमदने 12 धावा केल्या. शरीफुल इस्लामचे खातेही उघडले नाही तर मुस्तफिझूर रहमानने 1 धाव काढली. मेहदी हसन मिराजने 32 चेंडूत 35 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. यादरम्यान त्याने 3 चौकारही मारले.

128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 11.5 षटकात 3 गडी गमावून 132 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या. यानंतर संजूने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली.

Pakistan Terror Attack: मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 8 जवानांचा मृत्यू

त्यानंतर हार्दिक पंड्याने स्फोटक खेळी खेळत फक्त 16 चेंडूत 39 धावा करून भारताला विजय मिळवून दिला. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक – एक विकेट घेतला.

follow us