FIFA Rankings : युरो कप (Euro Cup 2024) आणि कोपा अमेरिका स्पर्धेनंतर (Copa America 2024) गुरुवारी फिफाकडून क्रमवारी (FIFA Rankings) जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. नुकतंच जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार भारतीय 124 व्या स्थानावर आहे. यापूर्वी भारतीय संघ 121 व्या स्थानावर होता.
कतार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर 2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यानंतर भारताला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे फिफा क्रमवारीत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय संघ आपल्या सर्वोत्तम रँकिंगसह 99 व्या स्थानावर पोहोचला होता मात्र त्यानंतर भारतीय संघाला अनेक पराभव स्वीकाराव्या लागण्याने भारतीय संघ आता 124 व्या स्थानावर पोहोचला आहे.
तर ताज्या क्रमवारीत कोपा अमेरिका चषक जिंकणाऱ्या अर्जेंटिनाने आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे. तर युरो कपमध्ये उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतरही विश्वचषक उपविजेत्या फ्रान्सने क्रमवारीत आपले दुसरे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. युरो चषक विजेत्या स्पेनने पाच स्थानांनीवर जाऊन तिसरे स्थान पटकावले आहे.
इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे आणि ब्राझील पाचव्या स्थानावर तर बेल्जियम सहाव्या, नेदरलँड सातव्या, पोर्तुगाल आठव्या आणि कोलंबिया नवव्या स्थानावर आहे. फिफा क्रमवारीनुसार भारतीय संघ आशियामध्ये 22 व्या स्थानावर आहे. भारतीय संघाने आशियामध्ये लेबनॉन, पॅलेस्टाईन आणि व्हिएतनामला मागे टाकले आहे.
जूनमध्ये सुनील छेत्रीच्या (Sunil Chhetri) शेवटच्या सामन्यात कुवेतला पराभव करण्यात भारताला अपयश आल्याने आणि त्यानंतर कुवेत सिटीमध्ये भारताचा झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ विश्वचषक पात्रता फेरीतून बाहेर झाला आहे. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने मोठी कारवाई करत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची हकालपट्टी केली आहे.
“डॉक्टरांना योग्य ठिकाणी बसवा” शरद पवारांचा आ. लहामटेंवर हल्लाबोल
माहितीनुसार आता भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस भारत व्हिएतनाममध्ये मैत्रीपूर्ण तिरंगी मालिका खेळणार आहे. यजमान व्हिएतनाम आणि लेबनॉन विरुद्ध या मालिकेत भारतीय संघ भिडणार आहे.