FIFA World Cup 2026: पुढील वर्ल्ड कपसाठी ‘फिफा’ने बदलला प्लान, 4-4 टीम्सचे 12 ग्रुप तर…

FIFA World Cup 2026: पुढील वर्ल्ड कपसाठी ‘फिफा’ने बदलला प्लान, 4-4 टीम्सचे 12 ग्रुप तर…

FIFA WC 2026 : उत्तर अमेरिकेत होणाऱ्या FIFA विश्वचषक 2026 (FIFA WC 2026) च्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. FIFA ने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील विश्वचषक स्पर्धेत 4-4 संघांचे 12 गट असतील. यापूर्वी 3-3 संघांचे 16 गट तयार करण्याची योजना होती. FIFA ने निवेदनात म्हटले आहे की, ‘नवीन फॉरमॅट हे सुनिश्चित करते की प्रत्येक संघाला विश्वचषकात किमान 3 सामने खेळण्याची संधी मिळेल आणि हे सामने पुरेशा विश्रांतीसह असतील.’

विशेष म्हणजे फिफा विश्वचषक 2026 मध्ये प्रथमच 48 संघ सहभागी होणार आहेत. क्रीडा जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत केवळ 32 संघ सहभागी होत होते, ज्यांची 8 गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटात 4 संघ होते आणि गटातील अव्वल 2 संघ बाद फेरीत पोहोचले.

WPL प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ‘मुंबई इंडियन्स’

आता फॉरमॅट असा असेल

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या या विश्वचषकासाठी फिफाने सुरुवातीला ३-३ संघांचे गट तयार करण्याचे ठरवले होते, त्यापैकी प्रत्येक गटातून दोन संघ बाद फेरीत पोहोचणार होते. रवांडाची राजधानी किगाली येथे मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर 3-3 संघांना गटात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत अव्वल-2 संघांसह, सर्वोत्तम-8 तृतीय क्रमांकाचे संघ अंतिम-32 फेरीत पोहोचतील, तेथून बाद फेरीची सुरुवात होईल.

नव्या फॉरमॅटनुसार आता फिफा वर्ल्ड कपमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचणारे संघ 8-8 सामने खेळतील. FIFA वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 64 सामने खेळले गेले आहेत. 1998 पासून या स्पर्धेत 32 संघ सहभागी होत होते. 1998 पूर्वी फिफा विश्वचषकात 24 संघ सहभागी होत असत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube