Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025 ) उपांत्य फेरीत भारतीय संघाने धडक दिली आहे. ग्रुप सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला आहे. तर भारताचा शेवटचा ग्रुप सामना न्यूझीलंड (INDvsNZ) विरुद्ध होणार आहे. मात्र त्यापुर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) भारतीय संघाबद्दल मोठा दावा केला आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दावा केला आहे की, हायब्रिड मॉडेलमुळे भारतीय संघाला फायदा होत आहे तर दुसऱ्या संघाना त्यांचे ग्रुप सामने पाकिस्तानमधील वेगवेगळ्या ठिकाणी खेळावे लागत आहे मात्र भारतीय संघाला प्रवाशाबाबत कोणतीही अडचण येत नसल्याने त्यांना या स्पर्धेत फायदा होत आहे. असा दावा पॅट कमिन्सने केला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धे हायब्रिड मॉडेलवर करण्याचा आयसीसीने निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार भारताचे सर्व सामने दुबईमध्ये आयोजित करण्यात येत आहे. तसेच जर भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला तर या स्पर्धेचा अंतिम सामना देखील दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आपला शेवटचा ग्रुप सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे आणि त्यानंतर 4 मार्च रोजी सेमीफायनल सामना होणार आहे.
मोठी बातमी : १९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप
पॅट कमिन्सने याहू ऑस्ट्रेलियाला सांगितले की, “ही स्पर्धा आयोजित केली जात आहे हे खूप छान आहे, परंतु अर्थातच यामुळे त्यांना (भारताला) एकाच मैदानावर खेळण्याचा मोठा फायदा मिळतो.” त्यांचा संघ आधीच खूप मजबूत आहे आणि त्यांना त्यांचे सर्व सामने एकाच ठिकाणी खेळण्याचा फायदा होत आहे.” भारताने बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, जो 4 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल. जर टीम इंडियाने सेमीफायनल सामना जिंकला तर फायनल देखील याच मैदानावर होईल. पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.