India-Kuwait Football Match: सैफ चॅम्पियनशिपमध्ये (Saif Championship 2023) भारत आणि कुवेत यांच्यात खेळलेला सामना 1-1 असा बरोबरीत संपला. बंगळुरूच्या कांतेरावा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्याचा प्रभाव पॉइंट टेबलवर फारसा दिसणार नाही, कारण दोन्ही संघांनी उपांत्य फेरीसाठी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
कुवेतविरुद्धच्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाकडून शानदार सुरुवात पाहायला मिळाली. या सामन्याच्या 45व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 98वा गोल केला, ज्यामुळे भारतीय संघाने पहिल्या हाफअखेर सामन्यात 1-0अशी आघाडी घेत आपली स्थिती मजबूत केली.
BMC वरील मोर्चाला परवानगी नाकारताच, ठाकरेंनी मार्ग बदलला
दुसऱ्या हाफ सुरुवातीपासूनच मैदानावर दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान मॅच रेफरीने कुवेतच्या हमाद अल कलाफ आणि भारताच्या रहीम अलीला रेड कार्ड दाखवले. यानंतर 8 मिनिटांच्या इंजरी टाईममध्ये दोन्ही संघ 10-10 खेळाडूंसह मैदानावर खेळताना दिसले. दरम्यान, कुवेतच्या काउंटर अॅटक वाचवण्याचा प्रयत्न करत असताना भारताच्या अन्वर अलीने आपल्याच गोलपोस्टमध्ये गोल केला. यामुळे कुवेतला सामना 1-1 असा बरोबरीत ठेवण्याची संधी मिळाली.