BMC वरील मोर्चाला परवानगी नाकारताच, ठाकरेंनी मार्ग बदलला

  • Written By: Published:
BMC वरील मोर्चाला परवानगी नाकारताच, ठाकरेंनी मार्ग बदलला

1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत केली. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार होते पण आता या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोर्चाला परवानगी नाकारली. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मार्ग बदलण्याचे पत्र आयुक्ताना दिले आहे. (As soon as the march on the BMC was denied permission, Thackeray changed course)

जसा मविआचा मोर्चा झाला तशा मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. केवळ मार्गावरुन चर्चा करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली असून, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली नाही, तर केवळ मार्गा संदर्भात आम्ही भेट घेतली असे त्यांनी स्पष्ट केले.

एक वर्ष होऊन गेलं, महापालिका विसर्जित झाली आहे. पावसाप्रमाणे निवडणूकाही लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिम्मत आताच्या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे. रस्त्याच्या नावाने असेल, जी 20 च्या नावाने असेल, मुंबईला कोणीही मायबाप राहिलेला नाही. सर्व लुटालूट सुरु आहे. महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.

बॅंकेच्या प्रत्येक शाखेत देवेंद्र फडणवीसांचे तैलचित्र लावा, सदावर्तेंचे बॅंकेला निर्देश

ठाकरे गटाने मोर्चासाठी सर्व तयारी सुरु केली आहे. तसेच या मोर्चाचा टीझरही पक्षाने रिलीज केला आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगीच नाकारल्याने ठाकरेंची मोठी गोची झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube