India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे या सामन्याचा नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार होता. सामना साडेसात वाजता सुरू होणार होता. मात्र, बराच वेळ पाऊस पडत होता. त्यामुळे नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही. यानंतर पाऊस थांबण्याची बरीच प्रतीक्षा केली, मात्र पाऊस थांबला नाही आणि त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
‘लेकरु…लेकरु म्हणत राजकीय ढेकरु..,’; राणेंनंतर प्रसाद लाड यांनीही जरांगेंना सुनावलं
प्रेक्षक निराश होऊन परतले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये आले होते. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. मात्र, आता चाहत्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. सामन्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली. तब्बल अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
फडणवीस काड्या करत राहिले तर आम्ही डाव उधळणार; जरांगेंनी डायरेक्ट धमकावलंच
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका खेळणार
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला तीन सामन्यांची T20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये कर्णधार आहे. तर एकदिवसीय मालिकेत केएल राहुल कर्णधार असेल आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल. आता दुसरा T20 12 डिसेंबरला आणि तिसरा T20 14 डिसेंबरला खेळवला जाईल.