‘लेकरु…लेकरु म्हणत राजकीय ढेकरु..,’; राणेंनंतर प्रसाद लाड यांनीही जरांगेंना सुनावलं
Prasad Lad On Manoj Jarange Patil : लेकरु, लेकरु म्हणत आता राजकीय ढेकरु द्यायला सुरु केलं, असल्याचं म्हणत विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)</strong> यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. या सभेतून मनोज जरांगे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता प्रसाद लाड यांनीही जरांगेंना सुनावलं आहे. यासंदर्भातील एक पोस्ट लाड यांनी एक्सवर शेअर केलीयं.
जरांगे पाटील तुम्ही चुकताय!
आपण आत्ता राजकीय भाषा करायल लागलात!
लेकरू लेकरू म्हणत, आता राजकीय ढेकरू द्यायला सुरू केलं आहे.
जरांगे पाटील आपणाला मी सांगितलं होतं की राजकीय भाष्य करू नका! आणि आदरणीय देवेंद्र जींवर तर बिलकुल भाष्य करू नका!@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra… pic.twitter.com/a8nqaEWEl9— Prasad Lad (@PrasadLadInd) December 10, 2023
प्रसाड लाड पोस्टमध्ये म्हणाले, “जरांगे पाटील तुम्ही चुकतायं! आपण आत्ता राजकीय भाषा करायल लागलात! लेकरू लेकरू म्हणत, आता राजकीय ढेकरू द्यायला सुरू केलं आहे. जरांगे पाटील आपणाला मी सांगितलं होतं की राजकीय भाष्य करू नका! आणि आदरणीय देवेंद्रजींवर तर बिलकुल भाष्य करू नका!” या शब्दांत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Animal Box Office Collection: रणबीरच्या ‘अॅनिमल’ची छप्परफाड कमाई! नऊ दिवसांत 660 कोटींचा गल्ला
काय म्हणाले होते जरांगे?
देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना सांगितलं असेल की बोल म्हणून. कारण, लोंडा की फोंडा कोण आहे तो वळवळ करतोय. हे फडणवीसांनीच सुरू करायला लावलं आहे. ते त्यांच्या जवळचे आहेत. हे देवेंद्र फडणवीसांच्या ताटात जेवतात. मराठा समाजाशी तुमचा सामना आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात, मराठा बघतोय. तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांत कलह लावू नका…असं मनोज जरांगे म्हणाले होते.
मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर सडकून टीका केल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणेंनीही जरांगे यांना सोडलं नाही. ते म्हणाले, जरांगे यांना पहिल्याच दिवशी स्पष्ट केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर तुम्ही टीका केली तर ती आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही टीका कराल तर आम्हाला देखील तुमच्या डोक्यात विष कोण टाकतोय, तुमची भाषणं कोण लिहितंय? तुम्हाला मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय, याची आम्हाला पुराव्यासह यादीच काढावी लागेल, असं राणे म्हणाले.
तसेच मराठा आरक्षणाबाबत बोलत राहाल तर आम्ही तुमचं स्वागतच करू. मात्र मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या. आणि त्यांच्याच विरोधात तुम्ही भूमिका घेत आहात. फडणवीसांविरोधात जर तुम्ही बोलाल, भूमिका घ्याल तर गाठ या मराठ्याशी आहे, हे लक्षात असू द्या, असा इशारा नितेश राणेंनी दिला.