राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही; संजय राऊतांचे टीकास्त्र

  • Written By: Published:
राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही; संजय राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut on BJP : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नव्या राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या निमित्ताने भाजपने घरोघरी गुढी उभारण्याचं आवाहनही केलं. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली. राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र डागलं.

राज ठाकरेंची मुलगीही सोशल मीडियावर ट्रोल? शर्मिला ठाकरे म्हणाल्या.., 

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भरत जाधव यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला सोलापुरातील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, आम्ही अच्छे दिन आणू शकलो नाही. आम्ही लडाखमध्ये घुसलेल्या चीनला बाहेर काढू शकलो नाही. काश्मिरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांची घरवापसी करू शकलो नाही. बेरोजगारांना रोजगार देऊ शकलो नाही, हे त्या गुढीवर लिहिलं पाहिजे. भाजप हा पक्ष नसून इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी आहे, अशी टीका राऊतांनी केली.

Animal Box Office Collection: रणबीरच्या ‘अॅनिमल’ची छप्परफाड कमाई! नऊ दिवसांत 660 कोटींचा गल्ला 

ते म्हणाले, भारतीय पंचांगात गुढ्या उभारण्याची परंपरा आहे. आता ते गुढ्या उभारालया सांगतात. भाजपने नविन पंचांग काढला आहे का? पाडवा – दसऱ्याला आम्ही गुढ्या उभारू, त्यासाठी भाजपच्या आदेशाची आम्हाला गरज नाही राम मंदिर होतंय ही आनंदाची बाब आहे. मात्र, राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही. राम मंदिर हे हिंदूंचं नव्हे तर सर्व धर्मियांच प्रेरणास्थान आहे. जर रामाची मालकी जर भाजप घेत असेल तर ते रामाचे अवमूल्यन करतंय, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत समाविष्ट पक्षांनी जिल्हास्तरावर समन्वयासाठी समिती स्थापन केली पाहिजेय आता त्याला अधिक गती मिळाली आहे. अचानक सोलापूरला तो योग जुळून आला. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र राहून महाराष्ट्रात सध्या जे विष पसरले आहे, ते आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून नष्ट करायचं आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे ठरवलं आणि हे शुभसंकेत आहेत. सोलापूरचा हा फॉर्म्युला संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल, असं राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube