Download App

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही एन्ट्री; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

ज्यूनियर क्रिकेट समितीने 24 जून ते 23 जुलै 2025 दरम्यान इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर 19 संघाची निवड करण्यात आली आहे.

India tour of England 2025 : सिनियर टीम इंडिया इंग्लंडचा दौरा करणार आहे. अंडर 19 संघही याच महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर (India Tour of England) जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्क्वॉडची घोषणा (IND vs ENG) केली आहे. आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळलेल्या आयुष म्हात्रेला संघाचं कर्णधार करण्यात आलं आहे. तसेच 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीलाही संघात जागा मिळाली आहे.

बीसीसीआयने (BCCI) आज एक निवेदन प्रसिद्ध केले. यात म्हटले आहे की ज्यूनियर क्रिकेट समितीने 24 जून ते 23 जुलै 2025 दरम्यान इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर 19 संघाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात 50 ओव्हर्सचा सराव सामना, यानंतर पाच एकदिवसीय सामने तसेच इंग्लंड अंडर 19 संघाविरुद्ध दोन बहुदिवसीय सामने होणार आहेत.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघ जाहीर, इशान किशनसह ‘या’ स्टार खेळाडूला संधी

या दौऱ्यासाठी भारतीय अंडर 19 संघात आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह, आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युधाजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, आदित्य राणा, अनमोलजित सिंह यांचा समावेश आहे. तसेच राखीव खेळाडूंत नमन पुष्पक, डी दीपेश, वेदांत त्रिवेदी, विकल्प तिवारी, अलंकृत रापोल यांची निवड करण्यात आली आहे.

असा असेल इंग्लंड दौरा

मंगळवार 24 जून – सराव सामना
शुक्रवार 27 जून – पहिला एकदिवसीय
सोमवार 30 जून – दुसरा एकदिवसीय
बुधवार 2 जुलै – तिसरा एकदिवसीय
शनिवार 5 जुलै – चौथा एकदिवसीय
सोमवार 7 जुलै – पाचवा एकदिवसीय
12 ते 15 जुलै – पहिला मल्टी डे मॅच
20 ते 23 जुलै – दुसरा मल्टी डे मॅच

लवकरच टीम इंडियाचीही घोषणा..

भारतीय वरिष्ठ संघाचीही घोषणा लवकरच होणार आहे. टीम इंडिया पाच कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. बीसीसीआय लवकरच स्क्वॉडची घोषणा करण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर नवीन कर्णधार कोण असेल याचा शोध अजून संपलेला नाही. जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) आणि शुभमन गिल या (Shubaman Gill) दोघांचं नाव आघाडीवर आहे. आयपीएल प्लऑफ सामन्यांच्या आधी बीसीसीआय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

ऑलिंपियन भालाफेकपटू शिवपाल पुन्हा चाचणीत ‘डोप’ अपयशी, ‘ही’ होऊ शक्ते शिक्षा

follow us