Download App

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात मोठा गोंधळ; ‘या’ खेळाडूच्या नावात बीसीसीआयकडून मोठी चूक

नितीश रेड्डी यांनी प्रथम गोलंदाजी करत 2 षटकात 17 धावा दिल्या मात्र त्यांना एकही बळी घेता आला नाही. फलंदाजीत तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला

  • Written By: Last Updated:

India vs Bangladesh T20 : भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी अघाडी घेतली आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. अर्शदीप सिंगने 3 विकेट्स पटकावल्या.

नावावरुन गदारोळ

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केलं. पदार्पणाच्या या सामन्यात मयंक यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिलेच षटक निर्धाव टाकलं. तसंच सामन्यात 1 विकेट्स देखील घेतली. तर नितीश कुमार रेड्डीने 16 धावा केल्या. सामन्यात नितीश कुमार रेड्डीच्या नावावरुन गदारोळ उडाल्याचं दिसून आलं.

हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी अन् भारताचा शानदार विजय, बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा

नितीश रेड्डीच्या नावाशी संबंधित एक नवीन प्रकरण समोर आले आहे. नितीश रेड्डी यांनी प्रथम गोलंदाजी करत 2 षटकात 17 धावा दिल्या मात्र त्यांना एकही बळी घेता आला नाही. फलंदाजीत तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जिथे त्याने 15 चेंडूत 16 नाबाद धावा केल्या. नितीशने दमदार षटकारही मारला, पण तो चर्चेत आला आहे कारण त्याच्या जर्सीवर नितीश नव्हे तर ‘नितेश’ असे लिहिले आहे.

चूक कुणाची?

भारतीय क्रिकेटपटूचे अधिकृत नाव नितीश आहे. परंतु, जर्सीवर ‘नितेश’ लिहिलेले आहे ही बीसीसीआयच्या लॉजिस्टिक टीमने केलेली मोठी चूक असावी. सध्या अदिदास कंपनी भारतीय क्रिकेट संघाचे किट आणि जर्सी बनवते आणि नितीशचे नाव ‘नितेश’ असं लिहिण्यात उत्पादक कंपनीचीही चूक आहे.

कोण आहे नितीश कुमार रेड्डी?

नितीश कुमार रेड्डीच्या जर्सीमध्ये चूक झाली असली तरी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो खूश असेल. नितीश रेड्डीने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी 303 धावा केल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या. जर सनरायझर्स हैदराबादला नितीश कुमार रेड्डीला आयपीएल 2025 साठी संघात कायम ठेवायचे असेल तर फ्रँचायझीला किमान 11 कोटी रुपये द्यावे लागतील. याशिवाय हैदराबाद राईट टू मॅच (RTM) कार्डद्वारे नितीश कुमार रेड्डीला कायम ठेवू शकते.

 

follow us

संबंधित बातम्या