टीम इंडियाला बसला मोठा धक्का! शिवम दुबे टी-20 मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
Shivam Dube Ruled Out : बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका सुरू होण्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. ग्वाल्हेरमधील सामन्यापूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू शिवम दुबे दुखापतीमुळे बाहेर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकात दुबेच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. सांगितलं की तीन सामन्यांच्या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. दुबेला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. त्याच्या जागी तिलक वर्मा याची वर्णी लागली आहे.
अभिषेक शर्माला संधी
अलीकडेच बोर्डाने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सहभागी असलेल्या अभिषेक शर्माला संधी देण्यात आली आहे.
क्रिकेटर व्हायचं होतं पण बनले पक्के राजकारणी; एकाला तर मिळालं उपमुख्यमंत्रिपद..
शिवम दुबे बाहेर पडल्यामुळे तिलक वर्माचे संघात पुनरागमन झाले आहे. तो शेवटचा अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना दिसला होता. आतापर्यंत त्याने 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 139.41 च्या स्ट्राइक रेटने 336 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, 21 वर्षीय खेळाडूने केवळ दोन विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतके आहेत.
टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या , रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, तिलक वर्मा