भारत-श्रीलंका सामना टाय तरीही सुपर ओव्हरच नाही; जाणून घ्या, नियम काय सांगतो..

भारत-श्रीलंका सामना टाय तरीही सुपर ओव्हरच नाही; जाणून घ्या, नियम काय सांगतो..

IND vs SL : भारत (India) विरुद्ध श्रीलंकेचा पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत (IND vs SL) सुटलाय. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेने (Sri Lanka) 50 षटकांत आठ बाद 230 धावांपर्यंत मजल मारली होती. 231 धावांचे लक्ष्य गाठताना भारतालाही लंकेच्या गोलंदाजांनी झुंजविले. शिवम दुबेने (Shivam Dube) चांगली खेळी करत धावसंख्येची बरोबरी केली. पण असलंकाने त्याला पायचित केले. त्यानंतर अर्शदीप सिंगलाही (Arshadeep Singh ) असलंकाने पायचित केले. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या पद्धतीने सुपर ओव्हर होऊन भारताचा विजय (Team India) झाला. त्या पद्धतीने या सामन्यात सुपर ओव्हर का टाकली गेली नाही, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

India vs Sri Lanka : जिंकत आलेला सामना हातातून गेला ! भारत-श्रीलंका सामना बरोबरीत

भारताला विजयासाठी तीन षटकांमध्ये पाच धावा हव्या होत्या. पण भारतीय संघ चारच धावा करू शकला. 48 व्या षटकात असलंकाने दोन फलंदाज बाद केले. शिवम दुबे 25 धावांवर आणि अर्शदीप सिंह खाते न उघडताच बाद झाला. दोघांनाही असलंकाने पायचित केले. प्रथम फलंदाजी करत लंकेने आठ बाद 230 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगे आणि निसांकने अर्शतकीय खेळी केली. एकवेळ लंकेचा अर्धा संघ 105 धावांवर बाद झाला होता. पण वेल्लालगे आणि निसांकने चांगली खेळी करत 200 धावांपर्यंत नेले. त्यानंतर तळातील फलंदाज आपले योगदान दिल्याने लंकेने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

प्रत्युत्तरात भारतीय संघाची जोरदार सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्माने 33 चेंडूत अर्धशतक झळकविले. तर शुभमन गिल 35 चेंडूत 16 धावा केल्या.
रोहित शर्माने 47 चेंडूत 58 धावा केल्या. दोघांनाही वेल्लालगेने तंबूत परतविले. वाशिंग्टन सुंदरही पाच धावांवर बाद झाला. विराट कोहलीने 32 चेंडूत 24 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 23 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि अक्षर पटेलमध्ये 57 धावांची भागिदारी झाली. केएल राहुल 31 आणि अक्षरने 33 धावांची खेळी केली.

IND vs SL : सूर्याला वनडेत डच्चू, रियानला दोन्ही संघात लॉटरी; संघ निवडीत ‘या’ खेळाडूंना संधी

कुलदीप यादवही (Kuldeep Yadav) दोन धावांवर बाद झाल्याने भारताचे 211 धावांवर आठ गडी बाद झाले होते. आठव्या क्रमांकाला फलंदाजीला शुभम दुबेने 24 चेंडूत 25 धावा केल्या. त्यात त्याने दोन षटकार मारले. परंतु विजयासाठी एक धाव आवश्यक असताना असलंकाने त्याला बाद केले. तर अर्शदीप सिंगलाही असलंका शुन्यावर बाद झाला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. लंकेकडून हसरंगाने, असलंकाने प्रत्येकी तीन बळी घेतले.

सुपर ओव्हर का नाही ?

एकदिवसीय मालिकेआधी दोन्ही संघात टी 20 सिरीज झाली होती. या मालिकेतील तिसरा सामना टाय झाला होता. त्यावेळी सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय झाला होता. आताही एकदिवसीय सामन्यात तेच दोन संघ होते. मग सुपर ओव्हर का घेतली गेली नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. खरं तर यामागे एक नियम आहे. या नियमानुसार दोन संघांतील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सुपर ओव्हर होत नाही. सामना टाय झाला तर तो तिथेच संपतो. या सामन्याचा निकाल काढला जात नाही. या नियमामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हर झाली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube