क्रिकेटर व्हायचं होतं पण बनले पक्के राजकारणी; एकाला तर मिळालं उपमुख्यमंत्रिपद..
Cricketers turned Politicians : मानवी आयुष्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. माजी क्रिकेटपटू क्रिकेटनंतर राजकारणात आले आणि यशस्वी झाले अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु असेही काही नेते आहेत ज्यांना राजकारणात येण्यापेक्षा क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं होतं. पण त्यांच्या नशिबात मात्र वेगळच लिहिलं होतं. क्रिकेटमध्ये येणं तर जमलं नाहीच पण राजकारणात मात्र बॅटिंग करण्याची संधी या मंडळींना मिळाली. चला तर मग आज अशाच काही नेत्यांची माहिती घेऊ या ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं होतं पण राजकारणात नवी इनिंग सुरू करावी लागली.
बिहारचे माजी (Bihar News) मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी २०१० मध्येच राजदसाठी (RJD) निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. पण त्याआधी तेजस्वी यादव क्रिकेट खेळत होते. तेजस्वी यादव यांनी दिल्ली पब्लिक स्कूल येथून शिक्षण घेतलं आहे. शाळेत असतानाच त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. शाळेतील क्रिकेट संघाच कर्णधारपद त्यांच्याकडेच होतं.
रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती
तेजस्वी यादवांचं क्रिकेट कारकीर्द
दिल्लीच्या अंडर १७ आणि अंडर १९ संघांकडून तेजस्वी यादव क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी एक प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला आहे. या सामन्यात त्यांनी २० धावा केल्या होत्या. लिस्ट ए करिअरमध्ये तेजस्वी यादव यांच्या नावावर १४ धावा आणि एक विकेट आहे. इतकेच नाही तर २००८ मधील आयपीएल मध्ये दिल्ली संघाने तेजस्वी यादव यांना खरेदी देखील केले होते. पण त्यांना खेळण्याची संधी काही मिळाली नाही. २०१२ पर्यंत यादव संघाच्या स्क्वॉडचा हिस्सा होते. पुढे दुखापतीमुळे क्रिकेट सोडावे लागले असे तेजस्वी यादव यांनी एकदा सागितले होते. २०१३ मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी राजकारणाशी जोडले आहेत. त्यांचा परिवारही अनेक दिवसांपासून राजकारणात आहे. ओवेसी यांनी हैद्राबाद मधील शाळेत शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना त्यांनी क्रिकेटकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली होती. सन 2019 मध्ये ओवैसी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की त्यांनी हैदराबादेतील निजाम कॉलेजात शिक्षण घेत असताना विद्यापीठासाठी गोलंदाजी करत होते. विद्यापीठासाठी अंडर 25 संघात विजी ट्रॉफीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी साउथ झोन क्रिकेट संघासाठी खेळताना ओवैसींनी गोलंदाजीत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग: नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल गांधींची भेट