India vs England 5th Test : मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) रोमांचक सामन्यात इंग्लंडकडून विजय हिसकावून घेत ओव्हल कसोटी ६ धावांनी जिंकली आहे. सिराजने दुसऱ्या डावातील ५ विकेटसह सामन्यात ९ विकेट घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयाचा स्टार बनला. आजच्या विजयामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपवली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरु असताना इशान किशनवर मोठी जबाबदारी; बीसीसीआयने केली घोषणा
मोहम्मद सिराजने सामना बनलला रोमांचक
ओव्हलवरील कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती आणि भारताला ४ विकेट्सची आवश्यकता होती. पाचव्या दिवसाच्या पहिल्या षटकात क्रेग ओव्हरटनने २ चौकार मारून इंग्लंडसाठी दमदार सुरुवात केली. पण पुढच्याच षटकात सिराजने जेमी स्मिथला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवून सामना रोमांचक बनवला. त्यानंतर सिराजने पुढच्याच षटकात क्रेग ओव्हरटनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि टीम इंडियाला विजयाच्या अगदी जवळ आणले.
यानंतर गोलंदारी करत प्रसिद्ध कृष्णाने जोश टँगला क्लीन बोल्ड केले आणि इंग्लंडचा 9 वा बळी घेतला. यानंतर, एका हाताने फलंदाजी करण्यासाठी ख्रिस वोक्स आणि अॅटकिन्सन यांनी इंग्लंडला लक्ष्याच्या जवळ आणले पण शेवटी सिराजने अॅटकिन्सनला क्लीन बोल्ड केले आणि भारतीय संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. सिराजने मालिकेत सर्वाधिक 23 बळी घेतले.
ओव्हलवर भारताचा तिसरा विजय
१९७१ मध्ये ओव्हलवर भारताने पहिल्यांदा विजय मिळवला होता, त्यावेळी अजित वाडेकर भारताचे कर्णधार होते. ५० वर्षांनंतर २०२१ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा पराभव केला.
#INDvsENG भारत ने पांचवें और आखिरी टेस्ट मैच में इंग्लैंड को हराकर सीरीज 2-2 से बराबर की। pic.twitter.com/PiT9ERdHRi
— ANI_HindiNews (@AHindinews) August 4, 2025
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा भारताचा सर्वात कमी फरकाने विजय आहे. यापूर्वी २००४ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात अवघ्या 13 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता,. तर, १९७२ मध्ये भारताने इंग्लंडचा २८ धावांनी पराभव केला होता.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडच्या पहिल्या डावात, सलामीवीर जॅक क्रॉलीने ५७ चेंडूत ६४ धावांचे सर्वाधिक योगदान दिले. यादरम्यान क्रॉलीच्या बॅटवर १४ चौकार लागले. त्याच वेळी, दुसरा सलामीवीर बेन डकेटने ३८ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. डकेटने त्याच्या डावात ५ चौकार आणि २ षटकार मारले. हॅरी ब्रूकनेही ६४ चेंडूंचा सामना करत ५३ धावा केल्या. ब्रूकने त्याच्या डावात ५ चौकार आणि १ षटकार मारला. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी ४ बळी घेतले.
शेवटच्या चेंडूवर चौकार अन् पाकिस्तानचा पराभव; थरारक सामन्यात वेस्टइंडिज विजयी
इंग्लंडचा दुसरा डाव
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी शतके झळकावली. ब्रूकने 98 चेंडूंत 111 धावा केल्या. तर जो रूटने 152 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. रूट आणि ब्रूक यांच्यात चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली. सलामीवीर बेन डकेटनेही 54 धावांची उपयुक्त खेळी खेळली.
भारताचा पहिला डाव
भारतीय संघासाठी पहिल्या डावात करुण नायरने सर्वाधिक धावा केल्या. करुण नायरने १०९ चेंडूत ५७ धावांचे योगदान दिले, ज्यात ८ चौकारांचा समावेश होता. युवा फलंदाज साई सुदर्शन (३८) आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (२६ धावा) यांनीही उपयुक्त धावा केल्या. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने शानदार गोलंदाजी केली आणि पाच बळी घेतले. जोश टंगने तीन बळी घेतले. तर, जखमी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने एक बळी घेतला.
मोठी बातमी, भारत – पाकिस्तान सामना होणार नाही; PCB ची घोषणा
भारताचा दुसरा डाव
दुसऱ्या डावात, भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार ११८ धावा केल्या. या वेळी यशस्वीने १६४ चेंडूंचा सामना केला आणि १४ चौकार आणि दोन षटकार मारले. नाईटवॉचमन आकाश दीप (६६ धावा), वॉशिंग्टन सुंदर (५३ धावा) आणि रवींद्र जडेजा (५३ धावा) यांनीही अर्धशतकीय योगदान दिले, ज्यामुळे भारतीय संघ चांगला धावसंख्या गाठू शकला. इंग्लिश संघाकडून वेगवान गोलंदाज जोश टोंगने पाच बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनलाही तीन विकेट मिळाल्या. तर, वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने दोन बळी घेतले.