Download App

Ind VS Eng: यशस्वीने शानदार शतक झळकविले; पण आनंदाच्या भरात केलेली चूक आली अंगलट

  • Written By: Last Updated:

Yashasvi Jaiswal Century: राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने (India) मजबूत पकड मिळविली आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या (England) गोलंदाजांना जेरीस आणले. तिसऱ्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal/strong>) शानदार शतक झळकविले. शतक झळकविल्यानंतर आनंदात यशस्वीने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पद्धतीने उंच उडी मारत आनंद साजरा केला. परंतु उंच उडी मारल्यानंतर त्याच्या कंबरेत चमक भरली. त्यामुळे त्याला शतकानंतर मैदानाच सोडावे लागले आहे. तो रिटायर्ड हर्ट ठरला.

Pune Loksabha : फडणवीस अन् अजितदादांच्या मर्जीतील काकडे यांनीही लावलाय आता जोर!

यशस्वीने 104 धावांची खेळी केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने दोन बाद 199 धावांपर्यंत मजल मारली असून शुभमन गिल आणि कुलदीप यादव हे मैदानावर आहेत. शुभमनने ही अर्धशतक झळकविले असून, तो 65 धावांवर नाबाद आहे. पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताकडे आता 322 धावांची मजबूत आघाडी झाली आहे. दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि रजत पाटीदार हे तंबूत परतले. कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर बाद झाला. तर रजत पाटीदार हा तर दहा चेंडू खेळून खातेही उघडू शकला नाही.


Pune Loksabha : फडणवीस अन् अजितदादांच्या मर्जीतील काकडे यांनीही लावलाय आता जोर!


इंग्लंडचा डाव 319 धावांवर आटोपला

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांत संपुष्टात आणला. मोहम्मद सिराजच्या घातक वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. सिराजने चार बळी घेतले. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यातही इंग्लंडचे फलंदाज अडकले. या दोघांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

पहिल्या डावातच धावांचा डोंगर
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. परंतु कर्णधार रोहित शर्मानेच डाव सांभाळत शतकीय खेळी केली. या खेळीमुळे भारतीय संघ अडचणीतून बाहेर निघाला. रोहित शर्माने 131 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजानेही शानदार 112 धावांची खेळी केली. कसोटी संघात पर्दापण करणाऱ्या सर्फराज खानने 62 धावांची जबरदस्त खेळी केली. तर खालच्या फळीतील ध्रुव जुरेलने 46 धावांची आणि रवींचंद्रन अश्विनने 37 धावांची योगदान दिले.

follow us