पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम

अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी दोन्ही संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळणार असून, या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Untitled Design   2026 10 03T090520.450

Untitled Design 2026 10 03T090520.450

India vs Pakistan Asian Games Final : आशियाई क्रीडा स्पर्धेतील आजचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी ठरणार आहे. कारण आज पुरुष क्रिकेटच्या सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. अंतिम सामन्यात गोल्ड मेडलसाठी दोन्ही संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळणार असून, या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

उपांत्य फेरीत टीम इंडियाने श्रीलंकेचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रभावी गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडलं आणि त्यांचा डाव मोठ्या फरकाने गुंडाळला. दुसरीकडे, पाकिस्ताननेही उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करत अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांचं लक्ष सुवर्णपदकावर असणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 रोजी जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचं थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर सोनी लिव्हवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

दुष्काळाच्या सावटाखालील धरणांची पातळी खालावली, उजनी-जायकवाडीतून दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन

T20 क्रिकेटमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्डही लक्षवेधी आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 17 T20 आंतरराष्ट्रीय सामने झाले असून, भारताने 13 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला तीन सामन्यांत विजय मिळवता आला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. या आकडेवारीच्या आधारावर भारताचं पारडं जड दिसत असलं, तरी अंतिम सामन्यात मैदानावरील कामगिरी आणि महत्त्वाच्या क्षणी घेतले जाणारे निर्णय निर्णायक ठरणार आहेत.

दरम्यान, या सामन्यावर पावसाचं सावट राहिल्यास काय होणार, याबाबतही क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 2023 च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता आणि क्रमवारीच्या आधारे भारताला सुवर्णपदक देण्यात आलं होतं. मात्र, आयची-नागोया 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्याच्या निकालासाठी वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सामना नियमित पद्धतीने पूर्ण होऊ शकला नाही, तर निकालासाठी सुपर ओव्हरचा पर्याय वापरला जाऊ शकतो. आणि जर पावसामुळे सुपर ओव्हरसुद्धा खेळवता आली नाही, तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना संयुक्तपणे सुवर्णपदक देण्यात येणार आहे.

1 कोटींची लाच मागितली, 50 लाख स्वीकारताना पकडले; कार्यकारी अभियंत्यासह पाच जण अटकेत

त्यामुळे आजचा भारत-पाकिस्तान सामना हा केवळ दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील क्रिकेटचा सामना नसून, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकासाठीची थेट लढत आहे. भारताचा T20 मधील रेकॉर्ड आणि उपांत्य फेरीतील प्रभावी कामगिरी, तर पाकिस्तानचा फायनलपर्यंतचा प्रवास पाहता आजच्या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या महामुकाबल्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version