India vs Sri Lanka 1st odi: भारत (India) विरुद्ध श्रीलंकेचा पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटलाय. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेने (Sri Lanka) 50 षटकांत आठ बाद 230 धावांपर्यंत मजल मारली होती. 231 धावांचे लक्ष्य गाठताना भारतालाही लंकेच्या गोलंदाजांनी झुंजविले. शिवम दुबेने चांगली खेळी करत धावसंख्येची बरोबरी केली. पण असलंकाने त्याला पायचित केले. त्यानंतर अर्शदीप सिंगलाही असलंकाने पायचित केले. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. विजयासाठी एक धाव आवश्यक असताना भारताचे शेवटचे दोन फलंदाज सलग दोन चेंडूवर बाद झाले. एकाअर्थाने भारताचा विजयच श्रीलंकेने चांगली गोलंदाजी करत हिसकावून घेतलाय.
‘मी उमेदवारीसाठी हट्ट केलेला नाही, मात्र …’, सुजय विखेंची पुन्हा ‘गुगली’
भारताला विजयासाठी तीन षटकांमध्ये पाच धावा हव्या होत्या. पण भारतीय संघ चारच धावा करू शकला. 48 व्या षटकात असलंकाने दोन फलंदाज बाद केले. शिवम दुबे 25 धावांवर आणि अर्शदीप सिंह खाते न उघडताच बाद झाला. दोघांनाही असलंकाने पायचित केले. प्रथम फलंदाजी करत लंकेने आठ बाद 230 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगे आणि निसांकने अर्शतकीय खेळी केली. एकवेळ लंकेचा अर्धा संघ 105 धावांवर बाद झाला होता. पण वेल्लालगे आणि निसांकने चांगली खेळी करत 200 धावांपर्यंत नेले. त्यानंतर तळातील फलंदाज आपले योगदान दिल्याने लंकेने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Paris Olympics : भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव
A thrilling start to the #SLvIND ODI series.
The First ODI ends in a tie.
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzggf#TeamIndia pic.twitter.com/ILQvB1FDyk
— BCCI (@BCCI) August 2, 2024
रोहित शर्माचे अर्धशतक
प्रत्युत्तरात भारतीय संघाची जोरदार सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्माने 33 चेंडूत अर्धशतक झळकविले. तर शुभमन गिल 35 चेंडूत 16 धावा केल्या.
रोहित शर्माने 47 चेंडूत 58 धावा केल्या. दोघांनाही वेल्लालगेने तंबूत परतविले. वाशिंग्टन सुंदरही पाच धावांवर बाद झाला. विराट कोहलीने 32 चेंडूत 24 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 23 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि अक्षर पटेलमध्ये 57 धावांची भागिदारी झाली. केएल राहुल 31 आणि अक्षरने 33 धावांची खेळी केली.
कुलदीप यादव ही दोन धावांवर बाद झाल्याने भारताचे 211 धावांवर आठ गडी बाद झाले होते. आठव्या क्रमांकाला फलंदाजीला शुभम दुबेने 24 चेंडूत 25 धावा केल्या. त्यात त्याने दोन षटकार मारले. परंतु विजयासाठी एक धाव आवश्यक असताना असलंकाने त्याला बाद केले. तर अर्शदीप सिंगलाही असलंका शुन्यावर बाद झाला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. लंकेकडून हसरंगाने, असलंकाने प्रत्येकी तीन बळी घेतले.