India Vs Srilanka Colombo test Match : श्रीलंकेचा फलंदाज सोनल दिनुषाने (Sonal Dinusha )भारताविरुद्ध कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या डावातही शतक झळकावले. पहिल्या डावात 103 धावा केल्यानंतर सोनलने दुसऱ्या डावातही शतकीय खेळी केलीय. सोनलच्या झुंजार खेळीमुळे कोलंबो कसोटी (Colombo test) अनिर्णित राहिलीय. दोन सामन्याच्या कसोटी मालिका भारताने (India) 1-0 ने जिंकलीय. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत 9 बाद 503 धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेला दुसरा डाव 290 धावांवर आटोपला होता. या डावात सोनलने शानदार शतक झळकविले होते. भारताने लंकेला फॉलो आॅन दिल्याने तिसऱ्या डावात श्रीलंकेने 9 बाद 429 धावा करत पाचवा दिवस खेळून काढला आहे. सोनलने पहिल्या डावात 103 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात नाबाद 133 धावांची खेळी केली.
चार डावांत सोनलची तीन शतके
भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सोनल दिनुषाचे हे तिसरे शतक आहे. यापूर्वी गाले कसोटीतही त्याने शतक झळकावले होते. गाले कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 100 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 84 धावांची खेळी केली. कोलंबो कसोटीत पहिल्या डावात 103 धावा केल्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही शतक पूर्ण केले. शतकापर्यंत पोहोचण्यासाठी सोनलने 196 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकार लगावले. श्रीलंकेची परिस्थिती कठीण असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सोनलने संयमी आणि दमदार खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याची ही शतकी खेळी श्रीलंकेसाठी महत्त्वाची ठरली आणि त्यामुळे कसोटी सामना अनिर्णित ठरला.
श्रीलंकेकडून कसोटीच्या दोन्ही डावांत शतक करणारे फलंदाज
सोनल दिनुषा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक करणारा श्रीलंकेचा आठवा फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध श्रीलंकेकडून सर्वप्रथम दुलीप मेंडिस यांनी 1982 मध्ये चेन्नई कसोटीत दोन्ही डावांत शतके झळकावली होती. अरविंदा डी सिल्वा आणि कुमार संगकारा यांनी कसोटीच्या दोन्ही डावांत प्रत्येकी दोन वेळा शतक केले आहे. तर असंका गुरुसिन्हा, तिलकरत्ने दिलशान, धनंजय डी सिल्वा आणि कामिंदू मेंडिस यांनी प्रत्येकी एकदा हा पराक्रम केला आहे.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सोनल
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तीन शतके करणारा सोनल दिनुषा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेच्या अरविंदा डी सिल्वा यांनी हा पराक्रम दोन वेळा केला आहे, तर कुमार संगकाराने एकदा दोन सामन्यांच्या मालिकेत तीन शतके झळकावली आहेत.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके
3 शतके – अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) विरुद्ध पाकिस्तान, 1997
3 शतके – अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) विरुद्ध भारत, 1997
3 शतके – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध पाकिस्तान, 2007
3 शतके – हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध भारत, 2010
3 शतके – कुमार संगकारा (श्रीलंका) विरुद्ध बांगलादेश, 2013
3 शतके – युनूस खान (पाकिस्तान) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2014
3 शतके – मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध वेस्ट इंडिज, 2022
3 शतके – केन विल्यमसन (न्यूझीलंड) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2024
3 शतके – सोनल दिनुषा (श्रीलंका) विरुद्ध भारत, 2026
