IND W vs WI W : भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघांतील तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या लेकींनी वेस्ट इंडिजला (India vs West Indies) पराभवाची धूळ चारली. या विजयाबरोबरच मालिकाही जिंकली. तिसरा आणि अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. या सामन्यात भारतीय संघाने ६० धावांनी (Team India) विजय मिळवला. भारताच्या विजयात स्मृती मंधाना आणि ऋचा घोष या दोघींचे मोठे योगदान राहिले.
कर्णधार स्मृती मंधानाने ४७ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७७ धावा केल्या. या व्यतिरिक्त विकेटकीपर फलंदाज ऋचा घोषने २१ चेंडूत ३ चौकार आणि षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
विंडीजच्या धुवाधार फलंदाजीसमोर टीम इंडिया फ्लॉप; दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव
या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी तुफान खेळी करत २० ओव्हर्समध्ये २१७ धावा केल्या. कर्णधार मंधानाने ७७ धावांची वेगवान खेळी केली. ऋचा घोषनेही मोलाचे योगदान देत २५७.१४ अशा स्ट्राईक रेटने धावा केल्या.
भारतीय संघाने दिलेल्या २१८ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडिजची पुरती दमछाक झाली. वेस्टइंडिजची सुरुवात खराब राहिली. २० धावांवरच पहिली विकेट पडली. ५७ धावांवर दुसरी विकेट पडली. लगेचच ६२ धावांवर तिसरी विकेट पडली. यानंतर १०० धाव झालेल्या असताना चौथी विकेट पडली.
यानंतर पंधराव्या ओव्हरमध्ये १२९ धावा झालेल्या असताना वेस्टइंडिजचा पाचवा फलंदाज बाद झाला. यानंतर मात्र झटपट विकेट पडत राहिल्या आणि १५७ धावांवरच अख्खा संघ बाद झाला. या दरम्यान राधा यादवने ४ विकेट घेतल्या. तसेच रेणुका सिंह ठाकूर, सजीवन सजना, तितास साधू आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
वर्ल्डकपसाठी वेस्टइंडिज सज्ज; संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा पण, मॅचविनरच गायब