विंडीजच्या धुवाधार फलंदाजीसमोर टीम इंडिया फ्लॉप; दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव
IND W vs WI W : भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघातील तीन टी २० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विंडीजने चमकदार खेळ करत टीम इंडियाचा पराभव केला. विंडीजने हा सामना ९ गडी राखून जिंकला. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आता दुसरा सामना जिंकून विंडीजने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. दुसऱ्या सामन्यात कर्णधार हिली मॅथ्यूज विजयाची शिल्पकार ठरली. तिने १८०.८५ च्या सरासरीने केलेल्या ८५ धावा निर्णायक ठरल्या.
या सामन्यात वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी धुवाधार फलंदाजी केली. भारताने दिलेले १६० धावांचे लक्ष्य विंडीजने फक्त १५.४ ओव्हर्समध्येच पूर्ण केले. या दरम्यान भारतीय गोलंदाजांना फक्त एक खेळाडू बाद करता आला. वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय फायदेशीर ठरला.
West Indies out of World Cup 2023: विश्वविजेता वेस्ट इंडिज, 48 वर्षांत प्रथमच विश्वचषकातून बाहेर
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला २० ओव्हर्समध्ये फक्त १५९ धावा करता आल्या. कर्णधार स्मृती मंधानाने ४१ चेंडूत ६२ धावा केल्या. ऋचा घोषने ३२ धावा केल्या. यानंतर अन्य कोणतीही खेळाडू विशेष काही करू शकली नाही. वेस्टइंडिजच्या गोलंदाज ठराविक अंतराने विकेट घेत राहिल्या. चार गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
विंडीजने केली कमाल
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्टइंडिजची सुरुवात चांगली राहिली. कर्णधार हिली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ या दोघींनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघींनी ६६ धावांची भागीदारी केली. सातव्या ओव्हरमध्ये विंडीजची पहिली विकेट पडली. कियाना जोसेफ २२ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावा करून बाद झाली.
यानंतर कर्णधार हिलीने शेमाइन कॅम्पबेल बरोबर ९४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. हिलीने ४७ चेंडूत १७ चौकारांच्या मदतीने ८५ धावा केल्या तर शेमाइन कॅम्पबेलने २६ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद २९ धावा केल्या. दरम्यान, या विजयानंतर विंडीजने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार