Download App

रोहित-गंभीरमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियाला झालंय तरी काय, 2019 नंतर पुन्हा फूट..

शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.

IND vs AUS Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत (IND vs AUS) आजपासून सुरू झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. भारतीय संघाला हा (Team India) सामना कोणत्याही परिस्थतीत जिंकावाच लागणार आहे. अन्यथा मालिका गमवावी लागेल. अशा परिस्थितीत एकजूट होऊन मैदानात उतरणे गरजेचे आहे. पण टीम इंडियात असं घडताना मात्र दिसत नाही. 2019 नंतर प्रथमच भारतीय संघ दोन गटात विभगल्याचे दिसत आहे. खराब कामगिरीमुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर पडला आहे.

शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर हा सामना भारतीय संघ जिंकेल असे वाटत नाही. भारतीय कॅम्पमधून अशा काही बातम्या बाहेर आल्या आहेत ज्यामुळे वातावरण अधिकच खराब झालं आहे. त्यातच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच करिअरही निवृत्तीच्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे.

गंभीरच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार नाही. त्याच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कर्णधार असेल. याआधी रोहितच्या खेळण्याबाबत पत्रकारांनी गौतम गंभीरला (Gautam Gambhir) प्रश्न विचारला. त्यावर आम्ही खेळपट्टी पाहिल्यानंतर अंतिम 11 खेळाडूंची निवड करू असे उत्तर गंभीरने दिले.

दरम्यान रोहितने गुरुवारी कोणताही सराव केला नाही. रोहितला सिडनी कसोटीतून बाहेर केल्याने खराब फॉर्ममुळे संघाबाहेर जाणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. रोहितने याआधीच्या तीन कसोटी सामन्यातील पाच डावांत फक्त 31 धावा केल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचे ‘हे’ 5 मोठे विक्रम, अजून कोणीच मोडू शकलेलं नाही

रोहितचं टेस्ट करिअर संपलं?

याआधी अनिल कुंबळे आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांनी टेस्ट सिरीज सुरू असताना निवृत्तीची घोषणा केली होती. कारण त्यांचे शरीर कसोटी क्रिकेट खेळण्याच्या स्थितीत नव्हते. आता रोहितनेही त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला असा अर्थ काढला जात आहे. कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झाला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत वनडे क्रिकेटमध्ये रोहित खेळू शकतो. टी 20 क्रिकेटमधून त्याने आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. या दौऱ्यात पहिल्यांदाच प्रेस कॉन्फरन्समध्ये आलेल्या गौतम गंभीरने अंतिम 11 खेळाडूंबाबत काहीच माहिती दिली नव्हती.

सिडनी क्रिकेट मैदानात गुरूवारी सुद्धा लपाछपीचा खेळ सुरू राहिला. सर्वात आधी गौतम गंभीर आणि बुमराह खेळपट्टी पाहण्यासाठी गेले. त्यानंतर रोहितने खेळपट्टीचा अभ्यास केला. तिघेही एकत्रच उभे होते पण रोहित आणि गंभीर यांच्यात मोठ्या मुश्किलीने संवाद होऊ शकला. यानंतर गंभीर आणि बुमराह ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीमध्ये बराच वेळ चर्चा करत होते.

नंतर दोघेही आत निघून गेले. यावेळी रोहित आणि अन्य खेळाडू फुटबॉल खेळताना दिसून आले. यानंतर रोहित, आगरकर आणि बुमराह चर्चा करताना दिसून आले. यानंतर सर्वजण नेट प्रॅक्टिस करताना दिसले. पण यामध्ये रोहित आणि बुमराह कुठे दिसले नाहीत. त्यावेळी दोघे जण ड्रेसिंग रूममध्ये होते.

गंभीर पंत यांच्यातही अबोला

ज्यावेळी सराव अंतिम टप्प्यात होता त्यावेळी बुमराह नेटमध्ये आला. पाच मिनिटांनंतर रोहितही दाखल झाला. यावेळी गंभीर नितीश रेड्डीला (Nitish Kumar Reddy) फलंदाजीचा सराव करताना पाहत होता. नंतर रोहित फलंदाजी करू लागला. पण यावेळी दोघात चर्चा होताना दिसले नाही. तसेच गंभीर आणि पंत यांच्यातही कोणताच संवाद झाला नाही. फलंदाजीचा सराव झाल्यानंतर पंत शुभमन गिलच्या आई वडिलांशी बोलताना दिसून आला.

Khel Ratna Award 2024 : मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रविण कुमारला भारताचा सर्वोच्च ‘खेलरत्न’ पुरस्कार…

ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण गरजेचं

मालिकेतील शेवटचा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शीपमधील फायनल सामना खेळण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे. या फायनलमध्ये खेळण्याची संधी भारताला सुद्धा मिळू शकते पण यासाठी आगामी मालिकेत श्रीलंका ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकही सामना गमावू नये यासाठी भारताला प्रार्थना करावी लागणार आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय खराब राहिले आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित साठी हा दौरा अतिशय खराब राहिला. तसेच अतिशय बेजबाबदार शॉट खेळून बाद होणाऱ्या ऋषभ पंतवर गंभीरने आधीच संताप व्यक्त केला आहे. तरीदेखील सिडनी कसोटीत पंत अंतिम 11 खेळाडूंच्या यादीत आहे.

follow us