Download App

T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जर्सी लाँच; खेळाडू दिसणार नव्या रंगात

भारतीय संघाच्या 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता खेळाडूंसाठीच्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले.

Indian Cricket Team New T20 Jersey : यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशात (Indian Cricket Team New T20 Jersey) होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच वीस संघ पात्र ठरले आहेत. या संघांची घोषणा होत आहे. भारतीय संघाच्या 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता खेळाडूंसाठीच्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले. भारतीय संघाचे कीट स्पॉन्सर आदीदास आहे. या कंपनीने सोमवारी एक व्हिडिओ शेअक केला. त्यात भारतीय संघाची नवी जर्सी दिसत आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयनेही रिट्विट केला आहे.

Women’s T20 WC : स्कॉटलंडने रचला इतिहास; पहिल्यांदाच टी 20 चं तिकीट, श्रीलंकेचीही एन्ट्री

या व्हिडिओत जर्सी लाँचिंग दाखवण्यात येत असून यावेळी संघातील काही खेळाडूही हजर असल्याचे दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा दिसत आहेत. रोहित शर्मा कुलदीप आणि रवींद्र जडेजाला बोलावून जर्सीकडे पाहण्याचा इशारा करत आहे. जर्सी एका हेलिकॉप्टरवर लटकलेली दिसत आहे. या नव्या जर्सीत सर्वात वर पांढरी पट्टी दिसत आहे. मध्यभागी निळा रंग तर हाताच्या बाजूंना भगवा रंग दिसत आहे. भगवा आणि निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन दिसत आहे.

दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) मागील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली. T20 World Cup 2024 साठी बीसीसीआयने 15 खेळाडूंची निवड केली. या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड करण्यात आली.

T20 World Cup 2024 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, सिराज, जसप्रीत बुमराह.

T20 विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ जाहीर; टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचा पत्ता कट

राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्डकप वेळापत्रक

5 जून – भारत विरुद्ध आयर्लंड

9 जून – भारत विरुद्ध पाकिस्तान

12 जून – भारत विरुद्ध यूएसए

15 जून – भारत विरुद्ध कॅनडा

follow us

वेब स्टोरीज