अमेरिका हादरली! कार शो सुरु असतानाच अंदाधुंद गोळीबार, 10 जण ठार …
Mexico: अमेरिका गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. उत्तर मेक्सिकोतमधील बाजा कॅलिफोर्नियामध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये 10 जण ठार झाले आहेत. एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंट परिसरातील ऑल-टेरेन कार रेसिंग शोदरम्यान ही घटना घडली. हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो.
शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर..
एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंट भागात ऑल-टेरेन कार रेसिंग शो सुरु होता. याचदरम्यान, एका व्हॅनमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. अंदाधुंद गोळीबार झाल्यानंतर नागरिकांची एकच धांदल उडाली होती. अंदाधुंद गोळीबार झाल्याने अनेकांवर झाडण्यात आल्या. या गोळीबारात 10 जण ठार झाले तर 9 जण जखमी झाले आहेत.
सिद्धरमय्यांनी शब्द पाळला, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ‘फाईव्ह गॅरंटी’ मंजूर
गोळीबारात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांकडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहे.
PHOTO : जपानमध्ये पंतप्रधान मोदींचा दबदबा, G7 शिखर परिषदेत भारताची ताकद दाखवली
या घटनेची माहिती समजताच पोलिस प्रशासन, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराच्या घटनेनंतर या भागात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अनिल देशमुख, सुनील केदारांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावण्यासाठी फडणवीसांच्या हालचाली
दरम्यान, गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे एॅटर्नी जनरल रिकार्डो इव्हान कार्पियो सांचेझ यांनी दिली आहे. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून गोळीबारात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच हा गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.