PHOTO : जपानमध्ये पंतप्रधान मोदींचा दबदबा, G7 शिखर परिषदेत भारताची ताकद दाखवली

  • Written By: Published:
1 / 7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीसह विविध क्षेत्रात भारत-जपान मैत्री वाढवण्याच्याबाबत चर्चा केली.

2 / 7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथे जपानी लेखक, हिंदी आणि पंजाबी भाषिक पद्म पुरस्कार विजेते टोमियो मिझोकामी यांच्याशी संवाद साधला.

3 / 7

पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध जपानी कलाकार आणि लेखक हिरोको ताकायामा यांच्याशी संवाद साधला आणि दोन्ही देशांना जवळ आणण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.

4 / 7

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांचे व्हिएतनामचे समकक्ष फाम मिन्ह चिन्ह यांचीही भेट घेतली. ऊर्जा, तंत्रज्ञान, वाणिज्य आणि संरक्षण यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी भारत-व्हिएतनाम मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

5 / 7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची भेट घेतली. भारत आणि कोरिया यांच्यातील मैत्री आणि विकासाची क्षेत्रे मजबूत करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.

6 / 7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचीही भेट घेतली. त्यांना पाहताच बायडन यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली.

7 / 7

पंतप्रधान मोदींनी 20 मे रोजी हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या 42 इंचांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. अनावरणानंतर त्यांनी हिरोशिमा येथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube