T20 विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ जाहीर; टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचा पत्ता कट
T20 World Cup 2024 : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एक जूनपासून टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात (T20 World Cup 2024) होत आहे. या स्पर्धेसाठी यजमान अमेरिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. न्यूझीलँडचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मागील तीन विश्वचषकात न्यूझीलँड संघाकडून खेळणारा अँडरसन आता अमेरिकेकडून खेळताना दिसणार आहे.
उन्मुक्त चंदचा या संघात समावेश केलेला नाही. एप्रिल महिन्यात कॅनडात झालेल्या टी 20 मालिकेतही चंदचा समावेश नव्हता. त्यामुळे आता त्याला विश्वचषक संघात संधी मिळणार का याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. उन्मुक्त चंदला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देण्यात उन्मुक्त चंदचे मोठे योगदान होते. परंतु, या स्पर्धेसाठी निवडकर्त्यांनी त्याचा विचार केला नाही.
यूएसए संघाची कमान मोनांक पटेलच्या हाती देण्यात आली आहे. एरोन जोन्सकडे उपकर्णधारपदाची जबबादारी दिली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज अली खान याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यूएसए क्रिकेटच्या पाच सदस्यी निवड समितीने या 15 खेळाडूंच्या संघाची निवड केली. या स्पर्धेत मोनांक पटेल अमेरिका संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हाच संघ विश्वचषकाआधी ह्यूस्टन, टेक्सास आणि बांग्लादेशविरधात टी 20 सामने खेळणार आहे.
टी 20 विश्वचषकासाठी यूएसएचा संघ
मोनांक पटेल (कर्णधार), एरोन जोन्स, अँड्रीज गौस, कोरी अँडरसन, हरमीत सिंह, अली खान, जेसी सिंह, मिलींद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.
T20 विश्वचषकासाठी किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ
अमेरिका, वेस्टइंडिज, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, न्यूझीलँड, इंग्लँड, ऑस्ट्रेलिया, आयर्लेंड, स्कॉटलँड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, अफगाणिस्तान, ओमान, नामिबिया, नेदरलँड्स हे क्रिकेट संघ टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.