Download App

ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत भारतीय हॉकी संघाची विजयी खेळी

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या तुफानी खेळाने भारताला विजय मिळवून दिला आहे. FIH प्रो लीग हॉकी सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाचा 5-4 ने धुव्वा उडवला आहे. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने 14, 15 आणि 56व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिकची नोंद केली. आता भारत सोमवारी दुसऱ्या लेगच्या सामन्यात जर्मनीशी भिडणार आहे आणि बुधवारी पुन्हा ऑस्ट्रेलियाशी सामना खेळणार आहे.

दरम्यान भारतासाठी इतर दोन गोल जुगराज सिंग (17व्या मिनिटाला) आणि कार्ती सेल्वम (25व्या मिनिटाला) यांनी केला आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून बेल्ट्झ जोशुआ (दुसरे मिनिट), विलोट के (42वे मिनिट), स्टॅन्स बेन (52वे मिनिट), जलस्की अरन (56वे मिनिट) यांनी गोल केले.

सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवण्यास सुरुवात केली होती. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाकडून सामन्याच्या अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला जोशुआच्या गोलच्या जोरावर आघाडी घेण्यात आली. मात्र एका मिनिटात जुगराज सिंग आणि हरमनप्रीत यांनी केलेल्या दोन गोलनंतर भारतीय संघाने मध्यंतरापर्यंत 4-1 अशी मोठी आघाडी घेतली.

मुंबई ठरले देशातील सर्वाधिक ‘हॉटेस्ट’ शहर

सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही तर ऑस्ट्रेलियाने विलोटच्या गोलने सामन्यात पुनरागमन केले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीम देखील लयात आली होती.चौथ्या क्वार्टरमध्ये त्यांचा खेळाडू स्टेन्सने केलेल्या गोलमुळे ऑस्ट्रेलियाने भारताची आघाडी कमी केली पण हरमनप्रीतने 55व्या मिनिटाला आणखी एक गोल करून भारताला 5-3 ने आघाडीवर नेले.

राऊतांनी केले राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप, फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

मात्र त्यांनतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू झालेस्कीने एका मिनिटाला केलेल्या गोलने ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सामन्याची उत्कंठा वाढवली. यानंतर पुढील चार मिनिटे दोन्ही संघांनी अथक परिश्रम घेतले मात्र एकही गोल होऊ शकला नाही. दोन्ही संघांना 10-10 पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी भारताने तीन आणि ऑस्ट्रेलियाने दोन गोल केले.

Tags

follow us

वेब स्टोरीज