Download App

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार! शेड्यूल जारी, वाचा कधी अन् कुठे होणार सामने

भारतीय पुरुष हॉकी टीम आशिया कप स्पर्धेच्या तयारीसाठी म्हणून ऑस्ट्रेलियाचा दौरा (India vs Australia) करणार आहे.

Indian Hockey Team Tour to Australia : भारतीय पुरुष हॉकी टीम आशिया कप स्पर्धेच्या (India Hockey Team) तयारीसाठी म्हणून ऑस्ट्रेलियाचा दौरा (India vs Australia) करणार आहे. येत्या 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान पर्थ येथे चार सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. जागतिक रँकिंगचा विचार केला तर भारताचा हॉकी संघ आठव्या क्रमांकावर आहे. भारतीय टीम 15,16,19 आणि 21 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे.

यंदाचा हॉकी आशिया कप (Asia Cup) बिहारमधील राजगीर येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत विजयी संघ पुढील वर्षी होणाऱ्या एफआयएच वर्ल्डकपसाठी सरळ क्वालिफाय करणार आहे. यासंदर्भात हॉकी इंडियाने एक निवेदनात कोच क्रेग फुल्टन यांनी सांगितले की आशिया कप स्पर्धेच्या आधी होणारा हा दौरा भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळल्याने स्वतःचे परिक्षण करण्याची संधी मिळणार आहे.

क्रिकेट नंतर हॉकी! भारतात जाण्याआधी परवानगी घ्या; पाकिस्तान सरकारचे आदेश

नुकतेच युरोपात एफआयएच प्रो लीगमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन्ही टप्प्यात भारताचा 3-2 अशा फरकाने पराभव केला होता. मागील वर्षी पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला 3-2 अशा फरकाने भारताने मात दिली होती. ऑस्ट्रेलियाने सन 2013 पासून या दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या एकूण 51 सामन्यांपैकी 35 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर भारताने नऊ वेळा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. सात सामने मात्र अनिर्णित राहिले होते. एकंदरीतच या आकडेवारीचा विचार केला तर कांगारुंचे पारडे जड आहे.

follow us