हरमनप्रीतने रचला इतिहास! विस्डेन पुरस्कार मिळवणारी ठरली पहिली महिला भारतीय खेळाडू

Hamanpreet Kaur Wisden Cricketer Of The Year :  भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड होणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स, कीपर-फलंदाज बेन फोक्ससह न्यूझीलंड क्रिकेट संघाचे टॉम ब्लडॉल आणि डॅरिल मिशेल यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T161628.661

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 18T161628.661

Hamanpreet Kaur Wisden Cricketer Of The Year :  भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड होणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स, कीपर-फलंदाज बेन फोक्ससह न्यूझीलंड क्रिकेट संघाचे टॉम ब्लडॉल आणि डॅरिल मिशेल यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हरमनप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 111 चेंडूत 143 धावा केल्या होत्या. यासह, भारतीय संघाने 1999 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली संघाने आशिया चषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले.

समलैंगिक विवाहासंदर्भात संसद निर्णय घेणार, न्यायालयाने…

गेल्या वर्षी, हरमनप्रीतने 17 एकदिवसीय सामने खेळले आणि 58.00 च्या सरासरीने 754 धावा काढल्या. नाबाद 142 ही तिची सर्वोत्तम धावसंख्या होती. इंग्लंडच्या भूमीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे विस्डेन दरवर्षी 5 सर्वोत्तम खेळाडूंची निवड करते. कोणत्याही खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत एकदाच हा मान मिळू शकतो.

ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल… विधानभवनातून अजित पवारांचा राऊतांवर रोख…

गेल्या वर्षी, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा व्यतिरिक्त, न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन आणि दक्षिण आफ्रिकेची महिला कर्णधार डेन वॅन निकर्क यांना पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये नामांकन मिळाले होते.

Exit mobile version