Download App

Women’s Asia Cup : चक दे इंडिया! बांग्लादेशचा एकतर्फी पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री

शानदार कामगिरी करत भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी बांग्लादेशचा दहा विकेट्सने धुव्वा उडवला.

Team India beat Bangladesh in Asia Cup : भारतीय महिला संघाने आशिया कप स्पर्धेत (Women’s Asia Cup) आज कमालच केली. शानदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी बांग्लादेशचा दहा (Team India beat Bangladesh) विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह स्पर्धेसह टीम इंडियाने स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. आता फायनलमध्ये कोणत्या संघाशी टक्कर होणार हे अजून निश्चित झालेलं नाही. या सामन्यात वेगवान गोलंदाज रेणुका सिंह आणि राधा यादवने (Radha Yadav) तीन-तीन विकेट्स घेतल्या तर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) अर्धशतक ठोकत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.

या सामन्यात शेफाली शहा आणि स्मृती मंधाना या दोघींनी चमकदार कामगिरी केली. फलंदाजीतही कमाल दाखवली. शेफालीने नाबाद 26 आणि मंधानाने नाबाद 55 रन केले. त्यामुळे भारतीय संघाने एकही विकेट न गमावता फक्त 11 ओव्हर्समध्येच 83 धावा करत सामना खिशात टाकला.

नेपाळचा पराभव करत सेमी फायनलचं तिकीट; भारताच्या लेकींची धडाकेबाज कामगिरी

शेफाली आणि मंधानाने भारताच्या डावाची सुरुवात वेगात केली. चौकार आणि षटकारांचा मारा केला. त्यामुळे सुरुवातीच्या पावर प्लेमध्येच 46 धावा झाल्या होत्या. या दोघींनी बांग्लादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. याआधी रेणुका सिंहने धारदार गोलंदाजी केली. दहा धावा देत तीन विकेट्स घेतल्या. फिरकी गोलंदाज राधा यादवने देखील चांगली गोलंदाजी केली. राधाने 14 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. सुरुवातीच्या सहा ओव्हर्समध्येच महत्वाचे फलंदाज बाद झाले होते. यानंतरच्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाला शतकही गाठता आले नाही.

पावर प्लेमध्ये 25 धावांतच बांग्लादेशचे (Bangladesh) तीन फलंदाज तंबूत परतले होते. यानंतर बांग्लादेशचा डाव गडगडला. कर्णधार निगारा सुल्तानाने सर्वाधिक 32 रन केले. तिच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज मैदानात फार काळ टिकू शकला नाही. त्यामुळे बांग्लादेशला फक्त 80 धावाच करता आल्या. नंतर भारतीय संघाने एकही विकेट न गमावता सामना जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही प्रवेश निश्चित केला.

T20 World Cup 2024: भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं

ब गटातून फायनलमध्ये कोण ?

या स्पर्धेच्या अ गटात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या तीन संघांना पराभवाची धूळ चारली आहे. तर पाकिस्तानने नेपाळ आणि युएईचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ब गटातून श्रीलंका आणि बांग्लादेश सेमी फायनलमध्ये पोहोचतील अशी शक्यता आहे.

 

follow us