नेपाळचा पराभव करत सेमी फायनलचं तिकीट; भारताच्या लेकींची धडाकेबाज कामगिरी

नेपाळचा पराभव करत सेमी फायनलचं तिकीट; भारताच्या लेकींची धडाकेबाज कामगिरी

Team India beat Nepal in Asia Cup : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा (Team India) दबदबा दिसत आहे. या स्पर्धेत भारताच्या (Asia Cup) महिला संघाने शानदार कामगिरी करत नेपाळचा (IND vs Nepal) पराभव केला. या विजयाबरोबरच सेमी फायनलचे तिकीटही पक्के केले. काल झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला.

श्रीलंकेत सुरू असलेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीतील हा अखेरचा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत श्रीलंकेला धूळ चारली. भारताप्रमाणेच पाकिस्तान (Pakistan) संघानेही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 178 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग नेपाळच्या संघाला करता आला नाही. फक्त 96 धावांतच त्यांचा डाव संपुष्टात आला.

आयसीसीचा मोठा निर्णय! आता टी 20 वर्ल्डकपमध्ये दिसणार 16 क्रिकेट टीम

भारतीय संघाच्या डावात शेफाली वर्मा हीने 81 धावांची धडाकेबाज खेळी केली. या कामगिरीबद्दल तिला प्लेअर ऑफ द मॅच अॅवॉर्ड देण्यात आले. भारताच्या आव्हानाच पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेपाळचा डाव मात्र गडगडला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दडपण कायम ठेवले. त्यामुळे नेपाळच्या फलंदाजांच्या विकेट मिळत गेल्या. या फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी भारतीय गोलंदाजांनी दिली नाही. त्यामुळे 20 ओव्हर्समध्ये नेपाळला फक्त 96 धावा करता आल्या.

या स्पर्धेच्या अ गटात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या तीन संघांना पराभवाची धूळ चारली आहे. तर पाकिस्तानने नेपाळ आणि युएईचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ब गटातून श्रीलंका आणि बांग्लादेश सेमी फायनलमध्ये पोहोचतील अशी शक्यता आहे.

टी 20 विश्वचषकाच्या आयोजनात गडबड; ICC च्या दोन अधिकाऱ्यांचा राजीनामा

महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये 16 टीम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये (ICC Women’s T20 World Cup) समानता आणण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीसीची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिला टी 20 विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये समानता राखण्याच्या वचनबद्धतेचे पालन केले जाईल असे संकेत या बैठकीत देण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube