टी 20 विश्वचषकाच्या आयोजनात गडबड; ICC च्या दोन अधिकाऱ्यांचा राजीनामा

टी 20 विश्वचषकाच्या आयोजनात गडबड; ICC च्या दोन अधिकाऱ्यांचा राजीनामा

ICC T20 World Cup 2024 : अमेरिकेत टी 20 वर्ल्डकपचे आयोजन करणे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC T20 World Cup 2024) चांगलेच महागात पडले आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी मध्ये भारत पाकिस्तानसह आठ सामने आयोजित करण्यासाठी आयसीसीने कोट्यवधी रुपये खर्च केले होते. या पैशांतून येथे तात्पुरत्या स्वरुपात एक स्टेडियम आणि खेळाडूंना सरावासाठी व्यवस्था करण्यात आली होती. अमेरिकी क्रिकेट संघाला आयसीसीने निलंबित केले होते त्यामुळे हे सगळे काम एक कंपनी स्थापन करून आयसीसीने स्वतः च केले.

आयसीसीच्या बोर्ड सदस्यांना हा विश्वास देण्यात आला होता की जास्त दरात तिकीट विकून हा तोटा भरून काढण्यात येईल. पण तसं काहीच घडलं नाही. त्यामुळे बीसीसीआयचे अनेक बोर्ड सदस्य नाराज आहेत. आता 19 ते 22 जुलै दरम्यान श्रीलंकेत होणाऱ्या (Sri Lanka) आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. याबाबत आयसीसीच्या काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होण्याचीही मागणी केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. अशी परिस्थिती असताना या बैठकीआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागे टी 20 विश्वचषकाच्या आयोजनातील गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.

ICC Rankings: हार्दीक पांड्याने रचला इतिहास, आयसीसी रॅंकिंगमध्ये पटकावलं अव्वल स्थान 

यंदा अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत टी 20 विश्वकप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या नियोजनावर मोठी टीका झाली होती. यामध्ये आयसीसीला मोठे नुकसानही झाले आहे. यानंतर इव्हेंट हेड ख्रिस टेटली आणि मार्केटिंग कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक क्लेअर फर्लांग यांनी राजीनामा दिला आहे. आयसीसीच्याच सदस्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. असोसिएट सदस्य पंकज खिमजी यांनी सर्व सभासदांना पत्र लिहून झालेल्या खर्चाचे ऑडिट करण्याची मागणी केली होती.

किती नुकसान झाले ?

आयसीसीच्या एका बोर्ड सदस्याने सांगितले की टी 20 वर्ल्डकपमध्ये आयसीसीला जवळपास 167 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. न्यूयॉर्कमधील सर्व निर्माण कार्य आणि सामन्यांच्या आयोजनासाठी 250 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. नंतर यामध्ये वाढ होऊन 292 कोटी रुपये झाले होते. येथील कामकाजावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की न्यूयॉर्कमध्ये जास्त दराने तिकिटांची विक्री होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात आयसीसीला इतकी कमाई होईल की सर्व नुकसान भरून निघेल. परंतु तिकीट विक्रीत गडबड झाल्याने तोटा जास्त वाढला.

आयसीसीने बॅलेटमधून काही तिकिटं प्रशासकांना दिली आणि नंतर भारत पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांची विक्री झाली असे दाखवण्यात आले. नंतर तिकिटे कमी किमतीत मार्केटमध्ये आणण्यात आली. ज्या व्यक्तीला काहीच अनुभव नव्हता अशा व्यक्तीला तिकिटांची जबाबदारी देण्यात आली होती. इतकेच नाही तर या स्पर्धेच्या संचालनासाठी टी 20 विश्वकप युएसए नावाने एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत अशा व्यक्तीची नेमणूक करण्यात आली ज्या व्यक्तीला काहीच दिवसांपूर्वी आयसीसीने काढून टाकले होते.

IND vs SA : टीम इंडियाच बादशहा! 13 वर्षांनंतर ICC ट्रॉफी भारतात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube