ICC Rankings: हार्दीक पांड्याने रचला इतिहास, आयसीसी रॅंकिंगमध्ये पटकावलं अव्वल स्थान…
Hardik Pandya ICC T20 Rankings: भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर बुधवारी (3 जुलै) आयसीसीने (ICC Rankings) नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) गरूड झेप घेतली आहे. या यादीत हार्दीक अव्वल स्थानी आला आहे. पुरुषांच्या T20 क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला.
Salman Khan: भाईजानचा ‘हा’ मोठा चित्रपट रिलीज आधीच वादात अडकला, चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा
हार्दिकने यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीतही चांगली कामगिरी केली आणि त्याचा फायदा त्याला टी-20 क्रमवारीत झाला. बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. त्याने हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट घेतल्या. 144 धावा करण्यासोबतच त्याने 11 विकेट्सही घेतल्या. या कामगिरीनंतर हार्दिक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आला आहे. पुरुषांच्या T20 क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. हार्दिकने सर्व दिग्गजांना मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
Hardik Pandya rises to No.1 in the latest ICC Men’s T20I All-rounder Rankings: ICC
(Pic: ICC) pic.twitter.com/QZ4Gq76MRW
— ANI (@ANI) July 3, 2024
कमी पटसंख्येची एकही शाळा बंद होणार नाही, मंत्री केसरकरांची ग्वाही
हार्दिकचा रेटिंग स्कोर 222 आहे. हार्दिक पांड्या आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचे रेटिंग समान असले तरी आयसीसीने हार्दिकला पहिले स्थान दिले आहे.
हार्दिक आणि हसरंगा यांचे आता 22 गुण आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस तिसऱ्या, तर सिकंदर रझा चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसनही पाचव्या क्रमांकावर आहे.
एनरिच नॉर्शियानेही गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली असून तो आता 7 स्थानांवर आला आहे. आदिल रशीद पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तिसऱ्या क्रमांकावर वनिंदू हसरंगा आहे. राशिद खान चौथ्या स्थानावर तर जोश हेजलवूड पाचव्या स्थानावर आहे.