Salman Khan: भाईजानचा ‘हा’ मोठा चित्रपट रिलीज आधीच वादात अडकला, चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा

Salman Khan: भाईजानचा ‘हा’ मोठा चित्रपट रिलीज आधीच वादात अडकला, चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा

Salman Khan Upcoming Movie Update: सलमान खान (Salman Khan) मुख्यतः ईद किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करत असतो. अशा परिस्थितीत भाईजानचे (Salman Khan) चित्रपट त्याच्या चाहत्यांचे सण खास बनवतात. सध्या सुपरस्टार सलमान ‘सिकंदर’वर (Sikandar Movie) जोमाने काम करत आहे. या चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा एक संपूर्ण ॲक्शन चित्रपट असणार आहे, ज्यामध्ये सलमानसोबत रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) देखील दिसणार आहे. दरम्यान, सुपरस्टारच्या आणखी एका आगामी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


गेल्या वर्षी दिग्दर्शक कबीर खानच्या ‘बब्बर शेर’ या (Babbar Sher Movie) चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. कबीर या चित्रपटासाठी पूर्णपणे तयार असल्याचे मानले जात होते. दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटासाठी सलमान खानचे नाव फायनल केल्याचेही माहिती समोर आली होती. मात्र आता हा चित्रपट अडकल्याचे दिसत असून, सलमान ‘बब्बर शेर’ होणार हे निश्चित झालेले नाही. नुकतचं कबीर खानने एका मुलाखतीत ‘बब्बर शेर’ बद्दल चर्चा केली.

चित्रपट सुरू होण्याआधीच वादात अडकला

हा चित्रपट सध्या बनत नसल्याचे दिग्दर्शकाने सांगितले. म्हणजेच सध्या कबीर खानचा ‘बब्बर शेर’च्या शूटिंगचा कोणताही प्लॅन नाही. याशिवाय त्यांनी कोणत्याही अभिनेत्याच्या नावाची पुष्टीही केली नाही. कबीरची ही प्रतिक्रिया पाहता हा ‘बब्बर शेर’ तूर्तास थांबला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. यामागचे खरे कारण आता फक्त दिग्दर्शकालाच माहीत आहे.

Salman Khan Threat: वसीम चिकनाला पोलिसांकडून अटक; बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड

कतरिनासोबत काम करण्याची अट ठेवली

कतरिना कैफसोबत काम करण्याच्या प्रश्नावर कबीर खानने पुन्हा एकदा अट ठेवली आहे. जेव्हा त्याच्याकडे चांगली स्क्रिप्ट असेल तेव्हाच तो कतरिनाशी संपर्क साधेल, असे त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कबीर म्हणाला की, त्याने कतरिनासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि पुन्हा एकदा तिच्यासोबत काम करायला आवडेल. तो स्पष्टपणे सांगतो की, जर एखादी कथा त्याला उत्तेजित करत असेल आणि कतरिनालाही ती आवडली तरच आपल्याला पुन्हा एकत्र काम करायला आवडणार असल्याचे सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज