Download App

बृजभूषण यांचा ‘डाव’ यशस्वी; कुस्ती महासंघाचे नवे ‘पहिलवान’ संजय सिंह आहेत तरी कोण ?

  • Written By: Last Updated:

Indian Wrestling Federation President Election: नवी दिल्लीः भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागले. त्यांच्याविरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक व इतर कुस्तीपटूंनी जोरदार संघर्ष केला. परंतु कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत या खेळाडूंच्या संघर्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण खासदार बृजभूषण शरण सिंह यांचेच वर्चस्व पुन्हा एका महासंघावर दिसून आले आहे. बृजभूषण यांच्या जवळचा व्यक्ती संजय सिंह (Sanjay Singh) हे कुस्ती संघाचे अध्यक्ष झाले आहेत. संजय सिंह अध्यक्ष झाल्याने साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह कोण आहेत हे जाणून घेऊया..

अजितदादांनी फक्त सांगावं मी बारामतीतून लढण्यास तयार…

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व इतर पदासाठी निवडणूक झाली. त्यात संजय सिंह यांना चाळीस मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रकुल पदक विजेत्या अनिता श्योराण यांना केवळ सात मते मिळाली आहेत. तर इतर पदावरही बृजभूषण सिंह गटाने वर्चस्व मिळविले आहे. संजय सिंह हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत आहेत. तर बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत.

जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामाची पुनरावृत्ती? सेनेचे जवान घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवादी हल्ला

संजय सिंह हे उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. परंतु सध्या ते वाराणसी येथे आपल्या कुटुंबाबरोबर राहतात. संजय सिंह (बबलू) गेल्या पंधरा वर्षांपासून कुस्ती महासंघाबरोबर आहेत. तर ते बृजभूषण सिंह यांच्या अंत्यत जवळचे आहेत. 2008 मध्ये ते वाराणसी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. सध्या ते कुस्ती संघाचे राष्ट्रीय संयुक्त सचिवपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी विदेश दौरे ही केलेले आहेत.

कार्यकारिणी सदस्यही बृजभूषण सिंह यांच्या गटाचे
दिल्लीचे जयप्रकाश, पश्चिम बंगालचे असिदकुमार साहा, पंजाबचे करतार सिंह आणि मणिपूरचे एन फोनी हे जिंकले आहेत. उपाध्यक्षपदाचे चारही पदे बृजभूषण शरण सिंह गटाला मिळाले आहेत. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे ही उपाध्यक्षपदाच्या रिंगणात होते. परंतु ते मतदानाला आले नाहीत. त्यांना केवळ पाच मते मिळाली. उत्तराखंडचे सत्यपाल सिंह देशवाल हे बृजभूषण गटाचे आहेत. ते कोषाध्यक्ष झाले आहेत. तर कार्यकारिणीचे पाचही सदस्यही बृजभूषण सिंह गटाचे आहेत.

Tags

follow us