Download App

श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव, वनडे इतिहासात भारताचा सर्वात मोठा विजय

  • Written By: Last Updated:

तिरुअनंतपुरम – तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.

श्रीलंककेडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक 19 रन्स केल्या. कसून राजथाने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार दासून शनाकाने 11 रन्स केल्या. तर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

गोलंदाजीत भारताकडून मोहम्मद सिराज हिरो ठरला ज्याने 32 धावांत 4 बळी घेत श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. सिराजशिवाय कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीने 2-2 बळी घेतले. फलंदाजीत विराट कोहलीने 166 आणि शुभमन गिलने 116 धावांची स्फोटक खेळी केली.

भारताने दिलेल्या 391 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 73 धावांवर आटोपला. भारताने 317 धावांनी विजय मिळवला आहे. याआधी 2008 साली न्यूझीलंडने 290 धावांनी आर्यलँडवर सर्वात मोठा विजय मिळवला होता. भारतीय संघाने या विजयासह श्रीलंकेला 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे.

टीम इंडियाने श्रीलंकेवर टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 18 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Tags

follow us