Download App

Big Breaking : ICC चा मोठा निर्णय; सर्व खेळाडूंना हेल्मेट अनिवार्य

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘उच्च जोखमीच्या पदांसाठी’ हेल्मेट अनिवार्य केले आहे. आयसीसीच्या नियमानुसार जेव्हा फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागतो, जेव्हा यष्टीरक्षक स्टंपपर्यंत उभे असतात आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ असतात तेव्हा हेल्मेटची सक्ती अनिवार्य आहे.

याआधी भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा याला हेल्मेट न घातल्याने आपली जीव गमवावा लागला होता. 22 फेब्रुवारी 1998 च्या दोन दिवस आधी म्हणजेच 20 फेब्रुवारीला ढाका येथे क्लब मॅच सुरू होती. रमण लांबा हेल्मेटशिवाय फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. फलंदाज मेहराब हुसेनने पुल शॉट खेळला आणि चेंडू त्याच्या कानावर आदळला. रमण लांबा यांना हेल्मेट घालण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्याची गरज नाही असे त्याला वाटले कारण त्याला क्षेत्ररक्षणासाठी त्या ठिकाणी पाठवले तेव्हा ओव्हरचे फक्त तीन चेंडू शिल्लक होते.

मल्लिकार्जुन खर्गेंना बजरंग दलाचे ‘ते’ वक्तव्य भोवले, पंजाब कोर्टाची नोटीस

 

हा फटका इतका भयंकर होता की चेंडू रमन लांबाच्या डोक्यावरून फिरला आणि यष्टिरक्षक खालिद मसूदच्या हातमोजेपर्यंत गेला. रमण लांबा जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पडली – ‘मी तर मेलो आता.’ यानंतर रमण लांबाची बहीण न्यूरोसर्जनसह दिल्लीहून बांगलादेशला पोहोचली, पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. 22 फेब्रुवारी रोजी त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आणि रमण लांबा यांना मृत घोषित करण्यात आले.

 

Tags

follow us