मल्लिकार्जुन खर्गेंना बजरंग दलाचे ‘ते’ वक्तव्य भोवले, पंजाब कोर्टाची नोटीस

मल्लिकार्जुन खर्गेंना बजरंग दलाचे ‘ते’ वक्तव्य भोवले, पंजाब कोर्टाची नोटीस

Mallikarjun Khargen Summoned by Punjab Court : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Khargen) यांना पंजाबच्या संगरूर न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. खर्गे यांच्यावर कर्नाटक निवडणुकीदरम्यान (Karnataka Elections) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. बजरंग दलाची (Bajrang Dal) तुलना प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबत केल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे.

‘बजरंग दल हिंदुस्थान’ या संघटनेचे अध्यक्ष हितेश भारद्वाज यांच्या तक्रारीनंतर संगरूर जिल्हा न्यायालयाने काँग्रेस अध्यक्षांना समन्स बजावले आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाची तुलना अल कायदासारख्या देशविरोधी संघटनांशी केली. खर्गे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने समन्स पाठवले.

त्याचवेळी वरिष्ठ विभाग न्यायाधीश रमणदीप कौर यांनी खरगे यांना 10 जुलै रोजी संगरूर न्यायालयात बोलावले आहे. हितेश भारद्वाज यांनी माहिती दिली आहे. खरे तर, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाचे नाव घेऊन “अल्पसंख्याक समुदायांबद्दल वैर किंवा द्वेष निर्माण करणार्‍या” संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते.

Karnataka CM : काँग्रेससाठी ‘बजरंगबली’ ठरलेले शिवकुमार ठरू शकतात त्रासदायक?; ही आहेत कारणं

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसची चांगली कामगिरी झाली आहे. काँग्रेसकडून बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार होणार यावरुन काँग्रेसमध्ये मंथन सुरु आहे. रविवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्याची जबाबदारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. खर्गे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube