Download App

कुस्तीपटूंसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषद आखाड्यात; भारतीय कुस्ती संघाला दिला बरखास्तीचा इशारा

Wrestler Protest: गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू मंगळवारी गंगा नदीवर आपली पदके टाकण्यासाठी पोहोचले होते, परंतु शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्या विनंतीनंतर विसर्जन रद्द करुन पुढे पाच दिवसांचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

दरम्यान, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) आता कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहे. कुस्तीपटूंची सर्वोच्च संस्था आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषदेने भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्याची धमकी दिली आहे. अनेक भारतीय कुस्तीपटू कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निषेध करत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे.

Manipur violence: ‘प्रादेशिक अखंडतेशी छेडछाड केल्यास भारताचे प्रतिनिधित्व करणार नाहीत’

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने मंगळवारी निवेदन जारी करून पोलिसांच्या कारवाईचा आणि कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचा तीव्र निषेध केला. 28 मे रोजी पोलिसांनी जंतरमंतर येथून 100 हून अधिक पुरुष आणि महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले. मात्र, तत्पूर्वी सायंकाळी उशिरा सर्व महिला कुस्तीपटूंना सोडण्यात आले. त्यानंतर इतर पैलवानांना सोडण्यात आले.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने म्हटले की, नुकतीच घडलेली घटना चिंताजनक आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले ही बाब अधिक चिंताजनक आहे. ज्या ठिकाणी ते महिनाभर आंदोलन करत होते, ती जागाही प्रशासनाने ताब्यात घेतली होती. कुस्तीगीरांना दिलेल्या वागणुकीचा आणि अटकेचा UWW तीव्र निषेध करतो. आतापर्यंत झालेल्या तपासावर निराशा व्यक्त केली. UWW संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन करते. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 45 दिवसांच्या घेतल्या नाही तर भारतीय कुस्ती संघ बरखास्त केले जाऊ शकते.

Tags

follow us