Manipur violence: ‘प्रादेशिक अखंडतेशी छेडछाड केल्यास भारताचे प्रतिनिधित्व करणार नाहीत’
Manipur violence : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. मणिपूरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूसह 11 खेळाडूंनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. राज्याच्या प्रादेशिक अखंडतेशी तडजोड झाल्यास सरकारने दिलेले पुरस्कार परत करू, असे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी सांगितले. हे 11 खेळाडू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देणार आहेत.
यामध्ये एल अनिता चानू (ध्यानचंद पुरस्कार विजेत्या), अर्जुन पुरस्कार विजेत्या एन कुंजरानी देवी (पद्मश्री), एल सरिता देवी आणि डब्ल्यू संध्याराणी देवी (पद्मश्री पुरस्कार विजेत्या) आणि एस मीराबाई चानू (पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या) या 11 खेळाडूंचा समावेश आहे.
Dearness Allowance : कर्नाटकात काँग्रेस सरकार येताच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट…
अनिता चानू यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘अमित शाह यांनी मणिपूरच्या अखंडतेचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले नाही तर आम्ही भारत सरकारने दिलेला पुरस्कार परत करू.’ जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर भविष्यात खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार नाहीत किंवा नवोदित प्रतिभेला प्रशिक्षण देणार नाहीत, असेही ते म्हणाले.
Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंसाठी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे सरसावला…
हे 11 खेळाडू शहा यांना निवेदन देण्यासाठी गेले होते परंतु केंद्रीय गृहमंत्री शहा हे कुकी पीडितांना आणि काही संघटनांना भेटण्यासाठी चुरचंदपूर येथे गेले होते. चानू म्हणाल्या की, ‘आम्ही निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना सादर केली आहे. अमित शाह चुरचंदपूरहून परतल्यानंतर संध्याकाळी त्यांची भेट घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यानंतर आम्ही त्यांना निवेदन सुपूर्द करू.