Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंसाठी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे सरसावला…

Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंसाठी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे सरसावला…

महिला कुस्तीपटूंसाठी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे पुढे सरसावला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल अनिल कुंबळेंनी दुख: व्यक्त केलं आहे. यासंदर्भातील ट्विट करत त्याने हा प्रश्न चर्चा करुन सोडवला जाऊ शकतो, ही समस्या लवकरात लवकर सुटणार असल्याची अपेक्षा कुंबळेंनी व्यक्त केली आहे.

अनिल कुंबळे ट्विटमध्ये म्हणाले, “28 मे रोजी आपल्या कुस्तीपटूंसोबत झालेली कारवाई पाहून खूप वाईट वाटले. चांगल्या संवादाने कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते. मी लवकरात लवकर ही समस्या सुटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Crime : उत्तर प्रदेशातून लातूरात आणत 11 वर्षीय तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून होती बेपत्ता…

जंतरमंतरवर भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेले.

Pune Loksabha : भाजप, महाविकास आघाडीतील नेत्यांना खासदारकीचे डोहाळे; बाहेरुन दोस्ती आतून कुस्ती

यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. यादरम्यान, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंच्या जंतरमंतरवरील सर्व तंबू देखील हटवले.

23 एप्रिलपासून देशातील अनेक कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करत होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube