CSK vs GT : अन् भव्य ओपनिंग सेरेमनीमध्ये अरजित सिंगने धरले धोनीचे पाय

Singer Arjeet Singh Touch Ms Dhoni Feet : आयपीएलच्या 16 व्या सीझनला कालपासून सुरूवात झाली आहे. सलामीच्या सामन्यापूर्वी या सीझनचा दिमाखदार ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम पार पडला. सलामीच्या सामन्यात कॅप्टन कूल धोनीच्या (MS Dhoni) संघाला गतविजेत्या गुजरात संघाकडून पराभव पत्कारावा लागला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी भर मैदानात घडलेली घटनेची चर्चा आता सुरू झाली आहे. Arijit Singh […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (36)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (36)

Singer Arjeet Singh Touch Ms Dhoni Feet : आयपीएलच्या 16 व्या सीझनला कालपासून सुरूवात झाली आहे. सलामीच्या सामन्यापूर्वी या सीझनचा दिमाखदार ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम पार पडला. सलामीच्या सामन्यात कॅप्टन कूल धोनीच्या (MS Dhoni) संघाला गतविजेत्या गुजरात संघाकडून पराभव पत्कारावा लागला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी भर मैदानात घडलेली घटनेची चर्चा आता सुरू झाली आहे.

त्याचे झाले असे की, आयपीएलच्या 16 व्या सीझनचं ग्रँड ओपनिंग प्रसिद्ध गायक अरजित सिंगच्या (Arjeet Singh) गाण्याने झाली. स्टार गायक अरिजित सिंग हा धोनीचा प्रचंड चाहता असून, कार्यक्रमाला सुरूवात होण्यापूर्वी अरजितने चक्क हजोरो चाहत्यांसमोर धोनीचे पाय धरत त्याला नमस्कार केला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सरपंचाच्या व्हिडीओची गिरीश महाजनांकडून दखल; गटविकास अधिकाऱ्याचं निलंबन

उद्घाटन समारंभात अरजीतने त्याच्या हिट गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया यांनी देखील हिट गाणी सादर केली. यानंतर मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी सलामीच्या सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना स्टेजवर बोलवण्यात आले. त्यावेळी चेन्नईचा कर्णधार धोनी अरजित जवळ पोहोचताच त्याने क्षणाचाही विलंब न करता धोनीचे पाय धरले. त्यानंतर लगेचच धोनीने अरजीतला उचलत मिठी मारली. सध्या या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू आहे.

IPL 2023 : धोनीचा इम्पॅक्ट प्लेअरचा डाव फसला; ‘या’ कारणांमुळे झाला पराभव

धोनीच्या संघाचा पराभव
कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने सीएसकेचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 7 गडी गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 19.2 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवात चांगली झाली. रिद्धिमान साहा 16 चेंडूत 25 धावा केल्या. तर, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 36 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. चेन्नईकडून हंगरगेकरने सर्वाधिक तीन बळी घेतले.

Exit mobile version