सरपंचाच्या व्हिडीओची गिरीश महाजनांकडून दखल; गटविकास अधिकाऱ्याचं निलंबन
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर (Social Media)एका सरपंचाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात हा सरपंच गळ्यात नोटांची माळ (Stack of notes)घालून आल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या (Panchayat Samiti)आवारात हा सरपंच पैशांची उधळण करतानाही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्याने (BDO) विहीर मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा सरपंचाने आरोप केला आहे. मंगेश साबळे (Mangesh Sable)असे पैशांची उधळण केलेल्या सरपंचाचे नाव आहे. त्या सरपंचाच्या आंदोलनाची दखल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी घेतली आहे. मंत्री महाजन यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडादेवी (Jyoti Kavadadevi)यांना निलंबित केले आहे.
Sanjay Raut Death Threat: मोठी बातमी! संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी!
याबाबत गिरीश महाजन यांनी सांगितले की, ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओंशी संपर्क करुन माहिती घेतली. त्या गटविकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसांमध्ये चौकशीचा अहवाल आल्यानंतर सर्व समोर येईल. त्याच्यानंतरही अजूनही कठोर कारवाई आपण करणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मला वाटतं या प्रकरणाची सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ चौकशी करायला हवी, असंही ते यावेळी म्हणाले.
सध्या सोशल मीडियावर एका सरपंचाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात हा सरपंच गळ्यात नोटांची माळ घालून आल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या आवारात हा सरपंच पैशांची उधळण करतानाही दिसून येत आहे.
मंगेश साबळे असे पैशांची उधळण करण्यात येणाऱ्या सरपंचाचे नाव आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगतात, परंतु फुलंब्रीच्या बीडीओ मॅडम लाचेची मागणी करत असल्याचे आरोप साबळे यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणीही नसल्याचे साबळे या व्हिडिओमध्ये सांगताना दिसून येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सरपंच मंगेश साबळे एका विहीरीच्या मंजुरीसाठी बीडीओ मॅडम, इस्टिमेटसाठी इंजिनिअर 15 हजारांची मागतात. एवढेच काय तर ग्रामरोजगार सेवकही पैशांची मागणी करतो. असे सर्वांनीच पैशांची मागणी केल्यानंतर दिवसरात्र राबणाऱ्या शेतकऱ्याने पैसा आणयचा कुठून? विहीरींसाठी शासन चार लाखांचे अनुदान देत आहे. परंतु सरकारी कर्माचारी लाखोंमध्ये पगार असूनही लाचेची मागणी करतात. मी दोन लाख घेऊन आलो आहे असे म्हणत चला आता 20 विहिरींच्या मंजुरीचं काम करा असे म्हणत साबळे या व्हिडिओमध्ये आक्रोश करत पैशांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत.