Download App

IPL 2023, GT vs MI : शुभमन गिलचे IPL मध्ये तिसरे शानदार शतक, पाडला षटकारांचा पाऊस

  • Written By: Last Updated:

IPL 2023, GT vs MI : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16 वा मोसमात . आज क्वालिफायर-2 सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने आहेत. अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला, जो आता थांबला आहे. पावसामुळे सामना अर्धा तास उशिरा सुरू झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे रोहित ब्रिगेडने लखनौ सुपर जायंट्सवर 81 धावांनी विजय मिळवला.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी मिळून ६.२ षटकात ५४ धावांची तुफानी भागीदारी केली. फिरकीपटू पियुष चावलाने साहाला यष्टीचीत करून ही भागीदारी तोडली. साहाने तीन चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकारांचा पाऊस पाडला. IPL मध्ये सलग तीन शतक लागवणारा गिल पहिला खेळाडू ठरला आहे

 

Tags

follow us