Download App

IPL 2023 : …म्हणून GPS लावून टीम इंडियाचे खेळाडू मैदानात उतरणार

IPL 2023 GPS Machine :  जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीलच्या 16 व्या सीजनच्या हंगामाला उद्या सुरुवात होणार आहे. भारताचे खेळाडूदेखील आपापल्या टीमसोबत आयपीएलसाठी सज्ज आहेत. आयपीएलच्या या हंगामात भारतीय खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे. या लीगमध्ये भारतीय खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी बीसीसीआयने खास सोय केली आहे.

आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. तसेच यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वर्ल्डकप देखील खेळवला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला आपल्या सर्व खेळाडुंची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी बीसीसीआयने एक खास सोय केली आहे.

IPL 2023 : IPLच्या दिमाखदार सोहळ्यात दिसणार दिग्गज अभिनेत्रींचा जलवा

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना दुखापतीपासून लांब ठेवण्यासाठी त्यांचा वर्कलोड मॅनेज करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल सुरु असताना देखील खेळाडूंचे वर्कलोड मॅनेज केले जाणार आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय खेळाडू जीपीएस डिवाइस घालून आयपीएल खेळण्यासाठी उतरणार आहेत. प्रॅक्टिसच्या वेळेस व सामन्या दरम्यान अशा दोन्ही वेळी खेळाडू हे जीपीएस मशीन घालणार आहेत.

या जीपीएस मशीनमुळे खेळाडूंची एनर्जी लेव्हल, त्यांचे हार्टबीट, ब्लड प्रेशर या सर्व बाबींकडे लक्ष देता येणार आहे. एकंदरित या डिव्हाइसमुळे खेळाडूंना कधी आराम पाहिजे व कधी ते खेळण्यासाठी पूर्ण फिट आहेत, याची माहिती मिळू शकणार आहे.

भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास पाकिस्तानचा नकार, ICC घेणार मोठा निर्णय

या डिवाइसचा उपयोग ऑस्ट्रेलिया व इंग्लंडची टीम देखील करत आहे. भारतामध्ये हे डिवाइस हॉकी टीमचे खेळाडू वापरतात. आत्ताच झालेल्या WPL लीगमध्ये देखील भारतीय महिला खेळाडूंनी हे डिवाइस वापरले होते. त्याच्यानंतरच आता आयपीएलमध्ये हे डिवाइस वापरले जाणार आहे.

 

Tags

follow us