Download App

IPL 2023 : जाणून घ्या अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी’ स्टेडिअमचा रेकॉर्ड

Narendra Modi Stadium Record :  आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याअगोदर भव्य अशी ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार परफॉर्मन्स करणार असल्याची देखील माहिती आहे. याआधी तु्म्हाला नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या रेकॉर्डविषयी माहिती देणार आहोत.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचे आधीचे नाव सरदार पटेल स्टेडिअम मोटेरा असे होते. या स्टेडिअमला 1982 साली बनवण्यात आले आहे. परंतु काही वर्षांपूर्वी या स्टेडिअमचे नूतणीकरण करण्या आले. आता हे जगातील सर्वात मोठे स्टेडिअम आहे. यानंतर या स्टेडिअमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडिअम करण्यात आले. ज्यावेळी या मैदानाचे सरदार पटेल स्टेडिअम तेव्हा देखील या मैदानावर आयपीएलचे सामने खेळवले गेले होते.

IPL 2023 : सलामीचा सामना गमावलेल्या संघाने जिंकलंय दोनदा जेतेपद; काय सांगतात आकडे

या मैदानावर पहिला सामना 2010 साली खेळवला गेला होता. या मैदानाचे नाव बदलल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2 आयपीएल सामने खेळवले गेले आहेत. एकुण या मैदानावर आत्तापर्यंत 7 सामने खेळवले गेले आहेत.

PHOTOS : पंतप्रधान मोदींची नव्या संसदेला भेट; कशी असणार रचना

या मैदानावर एकुण 7 सामने खेळवले गेले असून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमने फक्त 2 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या इनिगंमध्ये बॅटींग करणाऱ्या टीमने 5 सामने जिंकले आहेत. या मैदानावर अद्यापपर्यंत एकही सामना टाय झालेला नाही. या मैदानावरील हाएस्ट स्कोअर हा जॉस बटलरने केला होता. त्याने 2022 साली रॉयल चॅलेंजर्सच्या संघाविरुद्ध नाबाद 106 धावांची खेळी केली होती.

 

Tags

follow us