Download App

Hardik Pandya : हार्दिकने गुजरातला का सोडलं? मुंबईचं खास प्लॅनिंग ठरलं यशस्वी

Hardik Pandya : विश्वचषकानंतर आता भारतात लवकरच आयपीएलचा क्रिकेटचा (IPL 2024) थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी आयपीएल संघांनी तयारी सुरू केली आहे. खेळाडूंचा लिलाव दुबईत (IPL Auction) सुरू होणार आहे. त्याआधी संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात दिसून आला आहे. या संघाने पुन्हा एकदा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला सहभागी करून घेतले आहे. मागील आयपीएलमध्ये हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली होती. पण, यावेळी मात्र हार्दिक मुंबईकडून खेळताना दिसेल. असे काय झाले की गुजरातचा संघ सोडून हार्दिकने पुन्हा मुंबईलाच पसंती दिली. या प्रश्नाचं उत्तरही आता मिळालं आहे.

आयपीएल खेळाडूंसाठी लिलाव लवकरच सुरू होईल. अद्याप याबाबत नियोजन सुरू आहे. मात्र त्याआधीच तब्बल 15 कोटी रुपये मोजून मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या संघात घेतले आहे. रोहित शर्मासारखा स्टार फलंदाज संघात असतानाही हार्दिकची गरज का भासली असा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. खरंतर गुजरातचा संघही हार्दिकला सोडण्यास तयार नव्हता. कारण हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात आयपीएल विजेता बनला होता. मागील हंगामात आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरातने धडक दिली होती. त्यामुळे हार्दिक आपल्या संघात असावा असे गुजरातला वाटत होते.

हार्दिक पांड्या टी 20 संंघाचा कर्णधार आहे. आता टी 20 वर्ल्डकपही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पांड्या आपल्या संघात असावा असा मुंबईच्या निवडकर्त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग केलं. हार्दिकला संघात घेण्यासाठी तब्बल 15 कोटी रुपयांची रक्कम खर्च  करत त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. आता हार्दिकच्या सहभागाने मुंबईचा संघ अधिक मजबूत झाला आहे. आगामी आयपीएलमध्ये मुंबईची बाजू अधिक उजवी राहिल हेच यावरुन स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आयपीएलसाठी दुबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावाची तयारी सुरू आहे. यावेळी लिलावात जवळपास 1166 खेळाडूंनी आपली नावं दिली आहेत. आयपीएल संघ खेळाडू खरेदी करण्यासाठी 263 कोटी रुपये खर्च करणार आहेत. या लिलावाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आता कोणत्या संघाकडून कोणत्या खेळाडूंसाठी किती रुपयांची बोली लावली जाते आणि कोणता खेळाडू कोणत्या संघात सामील होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us